Friday, April 26, 2024

Latest Posts

Raj Thakrey साधणार छत्रपती शिवाजी महाराजांशी संवाद! ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो भन्नाट व्हायरल!

अभिनेता, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनेता, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमाचा पहिला भाग येत्या ४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंचे सडेतोड उत्तरे तसेच रोखठोक मुद्दे पाहायला प्रेक्षक प्रचंड उत्साहित आहेत. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो रिलीज झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत. तसेच यात अवधूत गुप्ते राज ठाकरे यांना म्हणतो की, ‘हा जादूचा फोन आहे. हा फोन डायरेक्ट कनेक्ट होतो. तुमच्या मनात जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही फोन करु शकता.’ यावर राज ठाकरे म्हणतात, “मला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बोलायचं आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की, तुम्ही कशासाठी झगडलात?”


‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी प्रत्येक प्रश्नांना रोखठोक उत्तर दिली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर राज ठाकरेंनी भाष्य सुद्धा केले. याशिवाय राज ठाकरेंनी आपल्या जीवनातील अनेक विविध आठवणींना उजाळा दिला.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात कला, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावतात. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावं लागत हे पाहणे महत्वाचे ठरेल. येत्या ४ जून २०२३ रोजी रविवारी ९ वाजता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss