Friday, April 26, 2024

Latest Posts

Ranbir Kapoor आणि Deepika Padukone पुन्हा आले एकत्र?

'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawani Hai Deewani) हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट रणबीर आणि दीपिकाच्या अनेक चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहे.

‘ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawani Hai Deewani) हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट रणबीर आणि दीपिकाच्या अनेक चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहे. या चित्रपटाला तब्ब्ल १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या निमित्त म्हणून हा क्षण खास करण्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट एकत्र आली होती. याच क्षणाचे काही छायाचित्र अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोनने बुधवारी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रत्येकजण खूप आनंदी तसेच एन्जॉय करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत दिपीकाने ‘यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है, एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे-नैना तलवार।’ असे कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन म्हणजे ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचा डायलॉग आहे, जो चित्रपट प्रेक्षकांनी अत्यंत डोक्यावर घेतला होता. आज ही या चित्रपटाचे बहुसंख्य फॅन्स आहेत.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये दीपिकाने ३ फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दीपिकासोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि कल्की (Kalki) दिसत आहेत. या फोटोंमध्ये दीपिका आणि रणबीर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून मस्तीच्या मूडमध्ये हसताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शेअर केलेल्या २ फोटोजमध्ये दीपिका आणि रणबीर एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहे. यामुळे चाहते भरपूर आनंदित झाले आहेत. दीपिकाने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये सिनेमाचे दिग्दर्शक आणि इतर टीम आहे. दीपिका आणि रणबीरच्या चाहत्यांना त्यांची आवडती जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा आहे. चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहर (Karan Johar) याने केली होती. तसेच या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने केले होते. हा चित्रपट ४ कॉलेज मित्रांच्या मैत्रीवर आधारीत आहे, जे अनेक बदलांसह अनेक वर्षांनी पुन्हा भेटतात. या चित्रपटातील संवाद आणि गाणी चांगलीच गाजली. ‘बलम पिचकारी’ आणि ‘बदतमीज दिल’ या चित्रपटातील गाणी आजही लोकांना आवडतात.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss