spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

Ranveer Allahbadia Controversy : ‘मला जीवे मारण्याची धमकी’; रणवीर अलाहाबादियाने पोस्ट शेयर करत व्यक्त केली भीती

Ranveer Allahbadia Controversy Post : अलीकडच्या काळात समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोची कॉंट्रोव्हर्सी सर्वांनाच पाहायला मिळाली. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं (Ranveer Allahbadia) आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. तेव्हापासून रणवीरला टार्गेट केलं जात आहे. रणवीरच्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून त्याचबरोबर ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या त्या भागात उपस्थित असलेल्या सर्वांचा पाय दलदलीत फसला आहे. तर या शो विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.

रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वक्तव्याविरोधात सिनेकलाकारांपासून राजकारणी, महिला आयोग आणि इतर विविध घटकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला असून गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया कुठेतरी गायब झाला असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा फोन देखील बंद असल्यामुळे पोलिसांचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, अशा चर्चा सुरु होत आहे. या दरम्यान रणवीर अलाहाबादियानं आता मौन सोडलं आहे. स्वतः रणवीर अलाहाबादियानं सर्वांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा देखील त्याने केला आहे.

रणवीर अलाहाबादियाने नेमकं पोस्टमध्ये काय लिहिलयं?
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या शो दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीरला अनेकजण ट्रोल करत असून त्याला बऱ्याच गोष्टींना समोर जावं लागत आहे. अशातच आता रणवीरने शोषलं मीडियावर पोस्ट शेयर करत आपल मौन सोडलं आहे. पोस्टमध्ये रणवीरनं म्हटलं आहे की, तो पळून जात नाहीये आणि त्याला भारताच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पुढे बोलताना रणवीरनं असा दावा केला आहे की, त्याला जीवे मारण्याच्या आणि त्याच्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याच्या धमक्या येत आहेत. त्याचबरोबर “मी आणि माझी टीम पोलीस आणि दुसऱ्या सर्व अथॉरिटीजसोबत को-ऑपरेट करत आहोत. योग्य त्या कार्यपद्धतीचा मी अवलंब करणार आहे आणि सर्व एजन्सीना तपास कार्यात मदत करणार आहे.

तर आई-वडिलांसंबंधित मी जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ते खूपच इंसेंसिटिव आणि अपमानजनक होतं. मी असं करायला नको होतं आणि मी यासाठी खरंच मनापासून सॉरी बोलतोय.” तर मला जीवे मारण्याच्या आणि माझ्या कुटुंबाला इजा पोहचवण्याच्या धमक्या येत आहेत असे मी पाहत आहे. रुग्ण असल्याचे भासवून लोकांनी माझ्या आईच्या क्लिनिकवर हल्ला केला आहे. मला भीती वाटत आहे आणि मला काय करावे ते कळत नाहीये. पण मी पळून जात नाही आहे. मला भारतातील पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमदार Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss