Friday, June 2, 2023

Latest Posts

“सरकार आपल्या दारी” योजनेच्या मार्फत सर्वसामान्यांना दिलासा, एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या समारंभाला संभाजी नगरमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या समारंभामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “सरकार आपल्या दारी’ ही योजना सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी आहे. आपण लोकांपर्यत जाऊ शकत नाही. अशा विचार मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केला आणि आम्ही त्यातून ही योजना साकारली. १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थी आहेत. ५५१ कोटी रुपयांचं साहित्य शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व योजनांचा समावेश करण्यात आलेले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. एनडीआरफच्या मदतीमध्ये वाढ करण्यात आली होती. गोगलगायींनी केलेल्या नुकसानीला मदतीच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. या सरकारवर जनतेच्या विश्वास आहे शासन आपल्या दारी योजना सर्वसामान्यांच्या दारामध्ये सरकारी योजना घेऊन येत आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यामुळे दळणवळण प्रवास सुखकर आणि कमी वेळेमध्ये होणार आहे. लवकरच समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss