Tuesday, June 6, 2023

Latest Posts

‘खतरों के खिलाडी’च्या शूट दरम्यानची रोहित शेट्टींची रील सोशल मीडियावर व्हायरल

‘खतरों के खिलाडी’ (Khataro ke Khiladi) या शो ची सध्या शूटिंग सुरु आहे. हा शो प्रेक्षकांच्या प्रसंतीचा शो आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हा शो निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit shetty) होस्ट करणार आहे.

‘खतरों के खिलाडी’ (Khataro ke Khiladi) या शो ची सध्या शूटिंग सुरु आहे. हा शो प्रेक्षकांच्या प्रसंतीचा शो आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हा शो निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit shetty) होस्ट करणार आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक कलाकार स्पर्धक चांगली कामगिरी करत आहेत असे सांगण्यात येत आहे. लवकरच ‘खतरों के खिलाडी’ सिझन १३ चे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेमध्ये होत आहे. नुकताच याचा एक व्हिडीओ बिग बॉस सिझन १६ उपविजेता शिव ठाकरेने (Shiv Thakare) त्याच्या सोशल मीडियावर टाकला आहे.

 

शिव नेहमीच्या त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. शिव ठाकरे हा सध्या दक्षिण आफ्रिकेत ‘खतरो के खिलाडी’साठी गेला आहे. मागील अनेक दिवस शिव याच्या सोशल मीडियावर त्याच्या ‘खतरों के खिलाडी’ च्या मित्रांसोबत तो व्हिडीओ आणि फोटो शेयर करत आहे. आज त्याने ‘खतरों के खिलाडी’ चे होस्ट रोहित शेट्टी यांच्यासोबत एक इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेयर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ‘खतरों के खिलाडी’चे सर्व स्पर्धक एका ठिकाणी उभे आहेत आणि त्यावेळी होस्ट रोहित शेट्टी चालत येताना दिसत आहेत. त्यानंतर रोहित शेट्टीला पाहताच शिव हा त्याच्याबरोबर हात मिळवतो. त्यानंतर हे सर्व स्पर्धक विविध पोझ देत फोटो काढताना दिसत आहेत. शिवने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “जेव्हा रोहित शेट्टी असं करतात, तेव्हा ट्रेंड अजूनच ट्रेंड व्हायला लागतो” असे लिहिले आहे.

Latest Posts

Don't Miss