Saif Ali Khan Attacked : मध्यरात्रीच्या सुमारास बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला झाला आहे. घरात शिरलेल्या अज्ञातांकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्राचं राजकारण पेटलेलं असताना आता मनोरंजन विश्वातील अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केला आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. सैफ अली खान याच्या मुंबईतील बांद्रा येथील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील नागरिकांनी आरडा-ओरड सुरू केली. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर समोरा-समोर आले. यावेळी चोराने चाकूने सैफ अली खानवर वार केले. सैफ अली खानला दुखापत झाल्यामुळे तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून मुंबई पोलिसांकडून आता या घटनेचा तपास घेतला जात आहे. चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने कामाला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा :
मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?
गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच