Tuesday, March 19, 2024

Latest Posts

salman आणि shahrukh दिसणार टायगर ३ मध्ये एकत्र?

बॉलीवूड चे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान हे नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट टायगर ३ या चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

बॉलीवूड चे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान हे नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट टायगर ३ या चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. त्याचबरोबर बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. त्यानंतर आता शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एका एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शूटिंगच्या दरम्यानचा बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि भाईजान सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टायगर ३ च्या सेटवरील सलमान खान आणि शाहरूख खान या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान खानाने चॉकलेटी रंगांचं टी-शर्ट आणि जीन्स परिधान केलेली आहे तर दुसरीकडे शाहरुख खानचा पठाण चित्रपटामधील लुक चाहत्याचे लक्ष वेधले आहे.

सोशल मीडियावरचा या व्हिडीओ पाहून टायगर ३ ची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. टायगर ३ वरचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. सलमान खान आणि शाहरुख ची सुपर हिट जोडी पाहण्यासाठी आम्ही टायगर ३ साठी उत्सुक आहोत अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. सलमान चा या नव्या टायगर ३ चित्रपटाकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss