Friday, March 29, 2024

Latest Posts

शाहिदचा नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच, या तारखेला होणार चित्रपट प्रदर्शित

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि नेहमीच त्याच्या स्टाइलने त्याच्या चाहत्यांना घायाळ करणारा शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा अनेकांचा लाडका आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि नेहमीच त्याच्या स्टाइलने त्याच्या चाहत्यांना घायाळ करणारा शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा अनेकांचा लाडका आहे. त्याच्या चित्रपटामधील अभिनयाने आणि त्याच्या क्रेझने तो त्याच्या चाहत्यांना नेहमीच खुश करत असतो. शाहिद हा नेहमीच्या त्याच्या कोणत्या न कोणत्या कारणाने तो चर्चेत असतो. शाहिदने नुकतचं ‘फर्जी’ या वेब सीरिजमधुन ओटीटीवर पदार्पण केले. त्याचा ओटीटी वरची फर्जी ही सिरीज चाहत्यांना खूप आवडली आणि चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला होता. शाहिद आता त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त झाला आहे.

शाहिदने त्याच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेयर केला होता. त्यांनतर त्याने आता ब्लडी डॅडीचं ट्रेलरही रिलीज करण्यात आले आहे. या ट्रेलर मध्ये शाहिदचा लुक पाहून त्याच्या चाहते हा चित्रपट पाहून उत्सुक झाले आहेत चित्रपट पाहण्यासाठी. ‘ब्लडी डॅडी’ ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे आणि ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहिद कपूरने सोशल मीडियावर ब्लडी डॅडीचा ट्रेलर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ए हेल ऑफ ए ब्लडी नाईट… ट्रेलर आऊट. #BloodyDaddyOnJioCinema’. ‘ब्लडी डॅडी’मध्ये भरपूर ऍक्शन आणि भरपूर स्टंट यांचा मसाला पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पूर्णने ऍक्शनने भरलेला हा चित्रपट असेल. यामध्ये शाहिद कपूर एक भयानक आणि रफ-अँड-टफ भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेता रोनित रॉय यांच्या भुमिकाही प्रेक्षकांना आवडणारी आहे. हा चित्रपट अली अब्बास जफरयांनी दिग्दर्शित केला आहे. शाहिद हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ९ जून रोजी हा चित्रपट jio सिनेमावर पाहायला मिळणार आहे. चाहत्यांनी ट्रेलर पाहून ट्विटरवर #BloodyDaddy ट्रेंड होत आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss