spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

सध्या आयपीएलचा (IPL) सिझन सुरु आहे आणि आयपीएलमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) धुव्वादार कामगिरी करत आहे.

सध्या आयपीएलचा (IPL) सिझन सुरु आहे आणि आयपीएलमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) धुव्वादार कामगिरी करत आहे. शुभमन गिल त्याच्या उत्तम फलंदाजीमुळे चर्चेत आहे. शुभमन आज तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शुभमन गिल याने ऍनिमेशन चित्रपट स्पायडरमॅन एक्रॉस द स्पायडर वर्स या चित्रपटामध्ये आपला आवाज दिला आहे. क्रिकेटर शुभमन गिल याने स्पायडरमॅनच्या ऍनिमेशन आपला आवाज दिला आहे. शुभमन गिल याने आज ऍनिमेशन फिल्म ‘स्पायडरमॅन : अक्रॉस द स्पायडर-वर्स’ याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँच केला आहे. विशेष म्हणजे त्या चित्रटपटामध्ये भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर ‘पवित्र प्रभाकरन’ याला शुभमन गिल याने आवाज दिला आहे. या चित्रपटातील हिंदी आणि पंजाबी चित्रटपटला आवाज दिला आहे.

 

ट्रेलर लाँच करताना शुभमनने सांगितले की तो लहानपणापासून स्पायरडमॅनचा फॅन आहे. २००२ मध्ये स्पायडरमॅन चित्रपट पहिल्यांदा पाहिल्याचे ट्रेलर लाँचवेळी शुभमन गिलने सांगितले. एवढेच नाही तर सात आठ वर्षाचा असताना स्पायडरमॅनला पाहून प्रेरित होईन भीतींवर चढण्याचा प्रयत्न शुभमन गिल करत होता असे त्याने स्वतः सांगितले. आयपीएलच्या सीझनमध्ये शुभमन दमदार फॉर्ममध्ये आहे. शुभमन गिलने आयपीएलच्या २०२३ च्या सीझनमध्ये दमदार शतक झळकावले आहेत. या वर्षीच्या सीझनमध्ये शुभमन गिलने एक शतक आणि चार अर्ध शतके झळकावली आहेत. गुजरात टायटन्सच्या विजयामध्ये शुभमन गिलचा मोठा वाट आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss