Friday, April 26, 2024

Latest Posts

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या आयोजित स्क्रीनिंगमुळे पुण्यामधील विद्यार्थी आक्रोश

'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. परंतु या चित्रपटावरून सुरु असलेला हा वाद काही थांबायचे नाव घेत नाही.

‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. परंतु या चित्रपटावरून सुरु असलेला हा वाद काही थांबायचे नाव घेत नाही. याच दरम्यान पुण्यामधील FTII मध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटाच्या आयोजित आधीच विद्यार्थ्यांचा एक गट चित्रपटाला कडाडून विरोध करत आहे. त्या गटाने स्क्रिनिंगच्या आधीच एफटीआयच्या परिसरामध्येच मोठ आंदोलन पुकारले आहे. परंतु या विद्यार्थ्यांच्या या विरोधाला न जुमानता ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरूच ठेवण्यात आले होते.

पुण्यामधील या स्क्रिंनिगच्या वेळेस ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची स्टारकास्टही उपस्थित असणार आहे त्यामुळे पुण्यामध्ये आज पोलिस मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आले आहेत. हा चित्रपट रिलीजच्या आधीपासूनच वादात होता. या वीकेन्डलाही हा चित्रपट लवकरच २०० करोडच्या क्लबमध्ये चित्रपट जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. बॉक्सऑफिसवर ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बड्या बड्या ६ चित्रपटाने मागे टाकले आहे. या चित्रपटामुळे सलमान खान, रणबीरपासूनचे सर्वांचेच चित्रपट गार पडले आहेत.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रियल लाइफमधील पीडित धर्मांतर झालेल्या महिलांना कॅमेरासमोर आणले आहे. यामुळे सगळीकडे एकाच खळबळ उडाली आहे. या चित्रपटाच्या कथेवर अनेकांशी टीका केली आणि बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाची स्क्रिंनिगवर सुद्धा बंदी घातली आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss