छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावरील एका मुलाखतीत बोलताना सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून मुघल सैनिकांना लाच देऊन सुटले असल्याचं वक्तव्य केले होते. त्याच घटनेचा निषेध म्हणून आज बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल सोलापुरकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागवी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊच शकत नाही, असे म्हणत राहुल सोलापूरकरांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असली तरीही शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अभिनेते राहुल सोलापुरकर (Actor Rahul Solapurkar) यांनी एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय विश्वात गदारोळ माजला होता. राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले त्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला होता. अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या भाष्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीकेची तोफ डागली होती. रोहित पवार यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत अभिनेत्याचा समाचार घेत इशारा दिला आहे. यासोबतच, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांसह अन्य नेत्यांनी अभिनेते राहुल सोलापुरकर (Actor Rahul Solapurkar) यांच्यावर टीकास्त्र उगारले होते. राहुल सोलापूरकर यांच्यावर या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीयांनी याचा मोठा निषेध व्यक्त केला. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी या विधानामागची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल सोलापुरकर (Actor Rahul Solapurkar) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले असून अभिनेत्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.
अभिनेते राहुल सोलापुरकर यांचं विधान काय होतं?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो.
हे ही वाचा :
Follow Us