Saturday, April 20, 2024

Latest Posts

The Kerala Story चित्रपटादरम्यान झालेल्या दुखापतीचे फोटो अभिनेत्रीने केले शेअर

सध्या "द केरला स्टोरी" (The Kerala Story) चित्रपट हा प्रचंड चर्चेत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट रिलीजच्या आधी आणि त्यानंतर सुद्धा हा चित्रपट प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

सध्या “द केरला स्टोरी” (The Kerala Story) चित्रपट हा प्रचंड चर्चेत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट रिलीजच्या आधी आणि त्यानंतर सुद्धा हा चित्रपट प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी देखील घातली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यामध्ये चित्रपटावर बंदी आणली होती परंतु त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या चित्रपटावरची बंदी हटवण्यात आली. अनेकांनी या चित्रपटाच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा चित्रपट ५ मे रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आता महिना होईल हा चित्रपट वादामध्ये असून सुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.

“द केरला स्टोरी” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे आणि १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाच्या कलाकारांवर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. चित्रपटाचा जलवा बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. सांगायचे झाले तर महिला केंद्रित असलेला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट “द केरला स्टोरी” हाच ठरला आहे. या वर्षीचा हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक कामे करणार चित्रपट ठरला आहे.

“द केरला स्टोरी” चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियाला शेयर केले आहेत. अदा शर्माने हिने जे फोटो शेयर केले आहेत ते फोटोस “द केरला स्टोरी” चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचे आहेत. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळच्या अदा शर्माने चेहऱ्यावर दुखापत झाल्याचे देखील दिसत आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss