Tuesday, April 16, 2024

Latest Posts

पश्चिम बंगालमधील “द केरला स्टोरी” चित्रपटाची बंदी हटवली

"द केरला स्टोरी" (The Kerala Story) हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच प्रचंड चर्चेत आहे. "द केरला स्टोरी" या चित्रपटावरून देशामध्ये अनेक वाद झाले.

“द केरला स्टोरी” (The Kerala Story) हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच प्रचंड चर्चेत आहे. “द केरला स्टोरी” या चित्रपटावरून देशामध्ये अनेक वाद झाले. अनेकांनी या चित्रपटाला विरोध देखील केला. या चित्रपटाच्या कथेमुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही काहीं लोकांनी केली होती. “द केरला स्टोरी” बाबतीत नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वजण चित्रपटाबाबत आपलं मत मांडताना दिसतात. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगलामध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपट राज्यामध्ये बंदी घातली.

त्यांनतर चित्रपटाच्या निर्मात्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला नई त्यानंतर मागील आठवड्यामध्ये सर्वाच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील “द केरला स्टोरी” चित्रपटावरची बंदी घालवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. तमिळनाडूला चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले आहे. आता देशामध्ये सर्वच ठिकाणी अदा शर्माचा चित्रपट मोठ्या स्क्रिनवर थिएटरमध्ये जात आहे. असे सांगण्यात आले आहे की बुक केलेले स्लॉट रद्द करू शकणार नाहीत. दोन ते तीन आठवड्यामध्ये सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला “द केरला स्टोरी” चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये बहुतेक सिनेमा गृहात “द केरला स्टोरी” चित्रपट प्रदर्षित करण्यास नकार दिला होता परंतु आता २४ परगणा ‘बनगाव’मधील सिंगल स्क्रीनने चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटगृहांमध्ये जवळपास सर्वच शो हाऊसफुल्ल आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर अदा व्यतिरिक्त, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी हे देखील कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांचा प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss