Thursday, April 25, 2024

Latest Posts

आज Sulochana Didi यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर(Sulochana Latkar) यांचे रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर(Sulochana Latkar) यांचे रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांच्यावर बऱ्याच दिवसनपासून उपचार सुरू होते. अखेर काल त्याच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी प्रभादेवी येथील राहत्या घरी सुलोचना दीदी यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५ नंतर शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत सुलोचना दीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दीदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

सुलोचना दीदी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. सुलोचना लाटकर यांना सुलोचना दीदी असे सर्व म्हणायचे. मराठी आणि हिंदी मिळून त्यांनी ४०० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. सुलोचना दीदी या विशेषतः ‘आई’च्या भूमिकेसाठी ओळखल्या जात. दीदींनी सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई पडद्यावर उत्तमपणे उमटली. सुलोचना दीदींचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे चित्रपट १९५३-५४ मध्ये प्रचंड गाजले. त्यानंतर दीदींनी कधी मागे वळून पाहिले नाही. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss