Thursday, April 25, 2024

Latest Posts

‘द केरला स्टोरी’ च्या निर्मात्यांचं जगाला रोखठोक उत्तर

विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात एक संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला आहे.

विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात एक संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला आहे. केरळमधल्या हजारो मुलींचं ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि त्यानंतर दहशतवादाच्या रॅकेटमध्ये त्यांना अडकवलं जातं. या चित्रपटात अशाच तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अदा शर्मा, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बहानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर रिलीज पाससूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक मोठमोठ्या लोकांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर भरभरून टीका केली होती.

नुकतीच ‘द केरळ स्टोरी’ च्या टीम ने पत्रकार परिषद आयोजित केली, यात संपूर्ण ‘द केरळ स्टोरी’ टीम सह ३२ पीडित महिलांनी हजेरी लावली. माध्यमांसमोरच सिनेमातील कलाकारांनी पीडित महिलांशी संवाद साधला. या दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ चे निर्माते विपुल शहा म्हणाले, “आमचा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका झाली. मात्र प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि हे खोत ठरवलं. हे सत्य जास्तीत जास्त लोकांसमोर पोहचणं गरजेचं आहे. सिनेमाचं जे व्हायचं ते होईल, पण आता आमचं ध्येय या मुलींना वाचवायचं आहे.आम्ही चित्रपटातुन तीन मुलींच्या माध्यमातून ३२ हजार मुलींची गोष्ट सांगितली आहे. आकड्यावरून काही लोकांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आमचं त्यावर हेच म्हणणं आहे कि चित्रपटातील तीन मुलींच्या माध्यमातून आम्ही त्या ३२ हजार पीडितांची कथा दाखवली आहे. आज मी या पीडितांना ५० लाख रुपयांची मदत देत आहे.”

‘द केरळ स्टोरी’ च्या याच पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, “दहशतवाद भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. पण इतर देशांमध्ये दहशतवादाविरोधात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत. आपल्या देशात दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने जेव्हा केरळचा प्रश्न आला तेव्हा लगेच लोक धर्माबद्दल बोलू लागले. माझ्या मते या चित्रपटातून आम्ही इस्लाम धर्माची सेवाच केली आहे. कारण या धर्माचा गैरवापर होतोय. हा किती मोठा धोका आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशभक्त भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा.”

हे ही वाचा : 

Sunglasses विकत घेताना ‘ही’ काळजी नक्की घ्या, नाही तर होऊ शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची परवानगी, पुढाऱ्यांनो गाढवपणा करू नका | Supreme Court Of India |

हिंदुत्त्वाच्या नावावर महाराष्ट्रात षडयंत्र – संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss