Thursday, April 25, 2024

Latest Posts

‘द केरला स्टोरी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार यूकेमध्ये

द केरला स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि या चित्रपटाची चर्चा आता देशभरामध्ये सुरु आहे.

द केरला स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि या चित्रपटाची चर्चा आता देशभरामध्ये सुरु आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. भारतामध्ये जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. भारतामधील अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

आता हा चित्रपट यूकेमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. या संदर्भामध्ये अभिनेत्री अदा शर्माने एक खास पोस्ट शेअर केली आहे. अदाने शेअर केलेले फोटोमध्ये एक कुत्रा दिसत आहे आणि त्या कुत्र्याला अदा ही फोनमध्ये काही तरी दाखवताना दिसत आहे. अदाने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘फायनली!!! द केरळ स्टोरी यूकेमध्ये रिलीज होत आहे. मी माझ्या नवीन मित्राला माझे हत्तीसोबतचे व्हिडिओ दाखवत आहे. पण माझ्या नव्या मित्राला सर्व व्हिडीओ दाखवावे लागतील, नाही तो क्या दोस्ती!’

अदाने शेअर केलेल्या फोटोला अनेक युजर्सने तिच्या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट केली आहे आम्ही द केरला स्टोरी २ ची वाट बघत आहोत. देशामधील अनेक राज्यांमध्ये द केरला स्टोरी चित्रपट देशामधील टॅक्स फ्री करण्यात आला आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावर अनेकांनी टीका सुद्धा केली. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss