Monday, June 5, 2023

Latest Posts

बहुचर्चित City Of Dreams 3 आजपासून आला प्रेक्षकांच्या भेटीला

अखेर बहुचर्चित 'सिटी ऑफ ड्रीम्स' (City Of Dreams 3) या वेबसीरिजचा ३ सीझन आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

अखेर बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City Of Dreams 3) या वेबसीरिजचा ३ सीझन आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच या तिसऱ्या सीझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकवर्ग या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. ही सीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सर्व ठिकाणी सिटी ऑफ ड्रीम्स ३ या सिरीजची चर्चा ही चालू आहे. या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat), प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि एजाज खान मुख्य भूमिकेत आहेत. तर या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा नागेश कुकुनूरने सांभाळली आहे. तर ‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ ही सिरीज आजपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर सर्वाना पाहता येणार आहे. तर दुसऱ्या सीझनचा जिथे शेवट होतो तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्ही आधीच दोन्ही सीजन पाहिलेले असणे देखील गरजेचे आहे. तरचं तुम्हाला सीजन तिसरा देखील समजू शकतो.

आज पासून ‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ ही सीरिज प्रदर्शित झाले आहे. अध्या ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून या सीरिजचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. तसेच तुम्ही जर का पाहिले दोन सीजन पहिले असतील तर त्यामध्ये आपल्याला गायकवाड हे पात्र केंद्रस्थानी असल्याचे दिसते. तसेच या तिसऱ्या सिजनमध्ये देखील अमेयराव गायकवाड पुन्हा एकदा सत्तेत आलेले प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अमेयराव गायकवाडचा अनोखा अंदाज या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. साम दाम दंड भेदाचा अवलंब करत सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होताना ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss