Friday, March 29, 2024

Latest Posts

Shark Tank India चे नवे पर्व लवकरच होणार सुरु

शार्क टॅंक इंडियाचे (Shark Tank India) सिझन १ आणि सिझन २ प्रचंड गाजले. या दोन्ही सिझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शार्क टॅंक इंडियाचे (Shark Tank India) सिझन १ आणि सिझन २ प्रचंड गाजले. या दोन्ही सिझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता लवकरच शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमाचे नवे पर्व म्हणजेच ‘शार्क टॅंक इंडिया ३’ (Shark Tank India 3) लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लहान उद्योजकांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होणार आहे. नुकताच शार्क टॅंक इंडिया ३ प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. शार्क टॅंक इंडिया ३ च्या प्रोमोमध्ये सुरुवातीलाच एक व्यावसायिक ‘बिझनेसमन टायकून ऑफ द इयर’ (‘Businessman Tycoon of the Year’) हा पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे.

शार्क टॅंक इंडिया ३ च्या प्रोमोमध्ये पुरस्कार स्वीकारताना ते म्हणत आहेत की, मी घरातून बाहेर पडलो तेव्हा माझ्या शर्टाच्या खिशात दहा रुपायाची फाटलेली नोट होती. वडिलांच्या बँक खात्यामध्ये ५० लाख रुपये होते. मला माझ्या काकांनी मला दिलेल्या १० कोटीच्या सरकारी कंत्राटावर मी जगत आहे. अनेक अडचणींना समोर जावे लागले आहे आणि त्या अडचणींचा सामना करून मी इथपर्यत पोहोचलो आहे. नव्या सिझनसाठी शार्क टॅंक इंडिया ३ चे रजिस्ट्रेशन सोनी लिव्हवरच करता येणार आहे.

तुम्ही सोनी लिव्हवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही शार्क टॅंक टीम इंडियाचे लक्ष वेधू शकता. या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे आणि ते ज्या कल्पनेने शार्क टॅंक इंडिया मध्ये आले आहेत. हे जाणून घेणारा हा शो आहे. आलेल्या स्पर्धकांच्या वेगवेगळ्या संकल्पना या शो मध्ये परिक्षकांना ऐकवल्या जातात. परिक्षकांना एखाद्या स्पर्धकाची कल्पना आवडल्यास ते त्या स्पर्धकाला आर्थिक पाठबळही देतात.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss