Saturday, April 20, 2024

Latest Posts

खुपते तिथे गुप्ते मधून मुख्यमंत्र्यांनी कोणाला केला ‘तो’ स्पेशिअल कॉल?

सध्या झी मराठी वाहिनेवर चालू होणाऱ्या नव्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. ह्या कार्यक्रमाचे नाव आहे 'खुप्ते तिथे गुप्ते'. महाराष्ट्राचा लोकप्रिय संगीतकार व गायक अवधूत गुप्ते या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे. तब्बल १० वर्षांनी हा कार्यक्रम परत एकदा सुरु होणार आहे त्यामुळे प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे.

सध्या झी मराठी वाहिनेवर चालू होणाऱ्या नव्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. ह्या कार्यक्रमाचे नाव आहे ‘खुप्ते तिथे गुप्ते’. महाराष्ट्राचा लोकप्रिय संगीतकार व गायक अवधूत गुप्ते या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे. तब्बल १० वर्षांनी हा कार्यक्रम परत एकदा सुरु होणार आहे त्यामुळे प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा प्रेक्षक वर्ग आणि खुपते तिथे गुप्ते मालिकेचा प्रेक्षकवर्ग ह्या एपिसोड (Episode ) ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा असून सगळ्यांनाच हा कार्यक्रम बघण्याची उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल (Viral ) होत आहे. या प्रोमो मध्ये आपल्याला असे बघण्यास मिळते की निवेदक अवधूत गुप्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचाराताना दिसतोय. अवधूत प्रश्न विचारताना असे म्हणतोय,”स्पेशिअल (Special) कॉल करण्याची संधी दिली तर कोणाला कॉल कराल बाळा साहेबांना (Balasaheb Thackeray) की दिघे साहेबांना (Aanand Dighe).

अवधूतचा प्रश्न ऐकल्यावर त्याला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,”अरे अवधूत कॉन्फरंस कॉल (conference call) केला तर चालेल का? मला दोघांसोबत बोलायचे आहे.” त्यामुळे अवधूत कॉन्फरन्स कॉल चा पर्याय देणार का हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. एकनाथ शिंदे आता बाळासाहेबांसोबत आणि आनंद दिघे साहेबांसोबत काय बोलणार हे जाणून घ्यायचं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

खुप्ते तिथे गुप्ते हा कार्यक्रम फारच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे आधीचे सीजन (Season) हे प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता हे नवीन पर्व पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहे. ‘खुप्ते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम झी मराठी वाहिनेवर ४ जून पासून सुरु होणार आहे. ४ जून २०२३ रोजी रविवारी रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच भागात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे उपस्थिती लावून या भागाची दर्जेदार सुरवात होणार आहे.

हे ही वाचा : 

Vat Purnima 2023, जाणून घ्या वटपौर्णिमेची पौराणिक कथा….

Spicy Chilli Oil Ramen बनवा फक्त १० मिनिटात; जाणून घ्या ही सिक्रेट रेसिपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss