Saturday, April 20, 2024

Latest Posts

ट्विटर वॉर : विवेक अग्निहोत्री vs उर्फी जावेद

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना वेगळा परिचय देण्याची गरज नाही. त्यांनी "द काश्मीर फाइल्स" (The Kashmir Files) सारखा सुपरहिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना वेगळा परिचय देण्याची गरज नाही. त्यांनी “द काश्मीर फाइल्स” (The Kashmir Files) सारखा सुपरहिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांचे नाव नेहमीच चर्चेचा विषय असतो. ते नेहमी त्यांच्या अनेकविधानांमुळे ते चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या कलाकारांना टोमणे मारण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाही. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे आणि यामध्ये अनेक बॉलीवूडमधील अभिनेत्री त्याचबरोबर भारतामधील अनेक अभिनेत्रीनी त्यांच्या फॅशनचा जलवा दाखवला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनला तिचा ड्रेस नीट करणाऱ्या म्हणजेच कॉस्टयूम स्लेव्स’वर ट्विट करून टीका केली आहे.

विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट तासाभरातच व्हायरल झाले आहे. त्यांनतर त्या ट्विटवर ट्विटर युजर्सने त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. फॅशनचे नाव घेतले की उर्फी जावेद हिचे नाव येतेच. उर्फीच्या अतरंगी फॅशनमुळे तिने जगामध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे उर्फीने लगेचच विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटला रिप्लाय करत ती चांगलीच भडकली आहे असे त्यातून दिसत आहे. उर्फीने विवेक अग्निहोत्रींच्या निर्मात्यावर टिपनीकरत त्यावर खोचक टीका केली आहे आणि सोशल मीडियावर त्याची निंदा सुद्धा केली आहे.

विवेक अग्निहोत्रीने त्याच्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, “तुम्ही लोकांनी ‘कॉस्च्युम स्लेव्हज’ नावाची संज्ञा ऐकली आहे का. ते बहुतेक मुली आहेत (या प्रकरणात एक योग्य माणूस). तुम्ही त्यांना आता भारतातही जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटीसोबत पाहू शकता. केवळ अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि अत्याचारी का बनत आहोत?” असे ट्विट त्याने केले आहे.

विवेक अग्निहोत्री च्या या ट्विट ला उर्फीने उत्तर दिले आहे की, “मला जाणून घायचे आहे की तुम्ही कोणत्या फॅशनच्या शाळेमध्ये आपली डिंगरी डिग्री घेतली आहे? तुम्हाला बघून असे वाटते की, तुमहाला फॅशनची भरपूर समज आहे, तुम्ही फॅशन मूवी दिग्दर्शित केली पाहिजे!

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss