Tuesday, April 23, 2024

Latest Posts

Cannes Film Festival मध्ये Urvashi Rautela चा हटके मेकओवर, ‘या’ अभिनेत्रीची कॉपी केल्याची नेटकऱ्यांची टीका

सध्या सर्व जगभरात कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा रंगली आहे. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये जगभरातील अनेक देशातून अनेक सिनेमे एकत्र येत असतात.

सध्या सर्व जगभरात कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा रंगली आहे. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये जगभरातील अनेक देशातून अनेक सिनेमे एकत्र येत असतात. कान्स फिल्म फेस्टिवलचे रेड कार्पेट हे बऱ्याच सेलिब्रिटींसाठी आणि फॅन्ससाठी विशेष आकर्षण असते. जग भरातून आलेले सेलिब्रिटी या रेड कार्पेटमध्ये आवर्जुन सहभाग घेतात. बॉलीवूड मधील अनेक सिने तारकांनी सुद्धा यात सहभाग घेतला आहे. गेले ३ दिवस हा फेस्टिवल सुरु असून बॉलीवूड मधल्या उर्वशी रौतेला या अभिनेत्री ने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वानाच आपले फॅन बनवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी उर्वशीने मगरीचा हार घालून फेस्टीवलमध्ये सर्वांचे लक्ष वेधले होते. या जबरदस्त हटके लुकमुळे सर्वत्र उर्वशीचीच चर्चा रंगली होती. त्याच बरोबर सोशल मीडियावर सुद्धा चाहत्यांनी उर्वशीच्या हटके लुक ची वाह वाह केली होती. मात्र कान्स फिल्म फेस्टिव्हलच्याच तिसऱ्या दिवसाच्या लुकमुळे उर्वशी रौतेला सोशल मीडिया वर भरपूर ट्रोल झाली.

उर्वशी रौतेलाने कान्स फिल्म फेस्टिवच्या तिसऱ्या दिवशी निळा आणि पांढरा रंगाचा ऑफ शोल्डर प्रिन्सेस गाऊन परिधान केला. या गाऊन मध्ये सुद्धा उर्वशी रौतेला हटके दिसत होती. परंतु सोबतच लावलेल्या इंक-ब्ल्यू लिपस्टिक मुळे उर्वशीला सोशल मीडिया वर ट्रोलिंग चा सामना करावा लागला. उर्वशी ऐश्वर्याची ची कॉपी करते अशी चर्चा पूर्ण सोशल मीडियावर होत आहे.

काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या बच्चन ने सुद्धा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेडकार्पेट वर जांभळ्या रंगाची लिप्प्स्टीक लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच प्रकारे कॉपी करत उर्वशी ने सर्वांचे लक्ष वेधले आहे, अशी टीका उर्वशी वर सर्व सोशल मीडिया च्या माध्यमातून होत आहे. फॅन्सनी उर्वशीने सोशल मीडिया वर शेअर केलेल्या फोटोस वर कंमेंट्स चा पाऊस करत उर्वशीची खिल्ली उडवली आहे. काही फॅन्स तर कॉमेंट करून म्हणाले आहेत उर्वशी एका खलनायिके सारखी दिसत आहे. तसेच दुसरीकडे काही फॅन्स ना उर्वशी चा इंक-ब्ल्यू लिपस्टिक मधला लुक आवडला. यामुळे फॅन्स कडून उर्वशी चे भरभरून कौतुक देखील होत आहे.

हे ही वाचा : 

IPL2023, Orange cap आणि purple cap च्या शर्यतीत एका सामन्यामुळे झाला फेरबदल

भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम राहतोय पाकिस्तानमध्ये, देशाच्या विरोधात रचतोय कट!

१६ आमदार अपात्रेबाबत जयंत पाटलांनी दिले स्पष्टीकरण, नार्वेकर आमचे जावई…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss