Thursday, April 25, 2024

Latest Posts

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांच्यावर बऱ्याच दिवसनपासून उपचार सुरू होते. अखेर आज त्याच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दीदींना पद्मश्री त्याचबरोबर महाराष्ट्र भूषणनं सन्मानित करण्यात आले होते.

सुलोचना दीदींना दादर मधील सुश्रुषा रुग्णालयामध्ये बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरु होते. काल रात्रीपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे त्यांची कन्या कांचन घाणेकर यांनी कालच सांगितले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्याचबरोबर सुलोचना दीदींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहायता निधीमधून करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांच्या उपचाराच्या दरम्यान तीन लाख रुपये रुग्णालयामध्ये जमा करण्यात आले आहेत.

सुलोचना लाटकर यांना सुलोचना दीदी असे सर्व म्हणायचे. सुलोचना दीदी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला होता. १९४३ मध्ये त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. सुलोचना लाटकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले आहे. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये सुलोचना काटकर यांना भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुलोचना दीदींनी २५० हुन अधिक चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट त्यांचे गाजले आहेत.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss