Thursday, March 28, 2024

Latest Posts

काही दिवसातच पाहा ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’, सिरीजचा प्रोमो रिलीज

प्रेक्षकांच्या आवडती वेब सिरीज सिटी ऑफ ड्रीम्सची (City of Dreams) चर्चा सगळीकडे रंगली आहे. लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांच्या आवडती वेब सिरीज सिटी ऑफ ड्रीम्सची (City of Dreams) चर्चा सगळीकडे रंगली आहे. लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक सिटी ऑफ ड्रीमचा भाग १ आणि सिटी ऑफ ड्रीमचा भाग २ या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता प्रेक्षकांना आतुरता लागली आहे की सिटी ऑफ ड्रीम भाग ३ मध्ये आम्हाला काय वेगळे पाहायला मिळेल या चर्चा रंगल्या आहेत. नुकताच सिटी ऑफ ड्रीम ३ या वेब सिरीजचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामधील डायलॉग प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या आहेत.

प्रोमोच्या सुरुवातीलाच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यामध्ये दिसत आहेत. सचिन पिळगावकर एक डायलॉग बोलताना याप्रमाणे दिसत आहेत. ते म्हणत आहेत की “साहेबांच्या निवृत्तीचा काय भरोसा नाही राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वतःचाच विचार करावा लागतो पक्ष व साहेब दोघांचीही मी खूप सेवा केली. परंतु साहेब त्यांच्याकडे त्यांच्या मुलीकडे सत्ता देणार इमानदारी फक्त कुत्र्यांचीच करावी राजकारणामध्ये कोणीही कोणाचे पाय दाबण्यासाठी नाही तर सत्तेसाठी येतात. यासाठी तुम्हाला कोणाचे पाय दाबावे लागू शकतात अथवा गळा! सचिन पिळगावकरांच्या या दमदार डायलॉगमुळे प्रेक्षक अजून उत्सुक झाले आहेत या तिसऱ्या भागासाठी.

नागेश कुकुनूर यांनी हा ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ दिग्दर्शित केला आहे. त्याचबरोबर या सिरीजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रिया बापट (Priya Bapat) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ प्रेक्षकांना २६ मे पासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss