Saturday, April 20, 2024

Latest Posts

मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके मामा नेमके आहेत कोण?, Ashok Saraf Birthday Special!

अशोक सराफ हे नाव मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यत प्रत्येकालाच माहिती आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अभिनेते म्हणजेच अशोक सराफ.

अशोक सराफ हे नाव मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यत प्रत्येकालाच माहिती आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अभिनेते म्हणजेच अशोक सराफ. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईत झाला आणि त्यांचे लहानपण दक्षिण मुंबईमधील चिखलवाडी येथे गेले. अशोक सराफ यांनी डीजीटी विद्यालय येथून आपले शिक्षण पूर्ण केले. कालांतराने सराफ यांनी अवघ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर राज्य केले आहे.

अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी लग्न केले. निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍ अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा आहे.अशोक सराफ यांच्या बरोबर धूम धडाका, आमच्या सारखे आम्हीच, फेका फेकी आणि इतरही बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या देखण्या अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या बरोबर त्यांचे धागे जुळले. अशोक सराफ सारख्या दिग्गज अभिनेत्याने घातलेली लग्नाची मागणी निवेदिता जोशी यांनी अगदी आनंदात स्वीकारली आणि त्या निवेदिता सराफ झाल्या. १९९० साली त्यांनी गोव्यामधील एका मंदिरात कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले.

अशोक सराफ यांनी बॉलीवूडमध्ये सुद्धा आपली मुळे खोल वर रोवली. राकेश रोशनच्या १९९५ मधील करण-अर्जुन चित्रपटात मामांनी मुंशीजी ही भूमिका साकारली. या भूमिकेने सर्वांच्या मनावर अधिराज्य केले व सर्वांना मामांची ही विनोदी भूमिका प्रचंड आवडली. अशोक सराफ यांनी साकारलेला येस बॉसमधील शाहरुख खानचा मित्र आणि अजय देवगणचा सिंघममधील सहकारी हेड कॉन्स्टेबल चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. विनोदाचा जबरदस्त टायमिंग असलेल्या या अभिनेत्याने अशा अनेक भूमिका मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये साकारल्या. त्यांनी गायलेलं ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ हे एव्हरग्रीन गाणं अजूनही आवडीने ऐकले जाते.

अशोक सराफ यांनी विनोदी भूमिका साकारल्यातच परंतु सोबतच त्यांनी गंभीर भूमिकेमधून सुद्धा आपला ठसा उमटवला. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. अशोक सराफ यांनी दादा कोंडकेसोबत पांडू हवालदार, कळत नकळत, भस्म यांसारखे अनेक चित्रपट केले आणि प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळे पैलू उमटवले.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss