Friday, March 29, 2024

Latest Posts

कोण होत्या Sulochana Latkar ?, सुलोचना दीदींचा जीवनप्रवास…

सुलोचना दीदी या ९४ वर्षांच्या होत्या. सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत तसेच हिंदी सिनेसृष्टीत कमाल ठसा उमटवला आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयातून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना दीदी या ९४ वर्षांच्या होत्या. सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत तसेच हिंदी सिनेसृष्टीत कमाल ठसा उमटवला आहे.

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म बेळगावमधील चिकोडी तालुक्यातील खडकलरत गावात ३० जुलै १९२८ रोजी झाला. सुलोचना दीदी यांनी १९४३ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दीदींना भालजी पेंढारकर यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. सुलोचना दीदींनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. सुलोचना दीदींनी मराठीत ५० तर हिंदीत तब्बल २५० चित्रपट केले.

सुलोचना दीदी या विशेषतः ‘आई’च्या भूमिकेसाठी ओळखल्या जात. दीदींनी सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई पडद्यावर उत्तमपणे उमटली. सुलोचना दीदींचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे चित्रपट १९५३-५४ मध्ये प्रचंड गाजले. त्यानंतर दीदींनी कधी मागे वळून पाहिले नाही. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सुलोचना दीदींचा अभिनेते मोतीलाल यांच्यासोबतचा ‘मुक्ती’ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांसारख्या दिग्दज अभिनेत्यांसोबत सुद्धा काम केले आहे. अभिनेत्री म्हणून सुलोचना दीदींनी ३० ते ४० चित्रपट केले. तसेच १९५९ मध्ये आलेल्या ‘दिल देके देखो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी १९९५ पर्यंत अनेक दिग्दज अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली. सुलोचना दीदींना १९९९ मध्ये ‘पद्मश्री’, तर २००९ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss