Thursday, April 18, 2024

Latest Posts

Zara Hatke, Zara Bachke ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

सध्या बॉलिवूडमध्ये जरा हटके जरा बचके (Zara Hatke, Zara Bachke) याच सिनेमाची चर्चा सुरु आहे आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये जरा हटके जरा बचके (Zara Hatke, Zara Bachke) याच सिनेमाची चर्चा सुरु आहे आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सारा अली खान आणि विकी कौशल हे प्रसिद्ध कलाकार आहेत. या दोघांच्या अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. प्रेक्षकांना ‘जरा हटके जरा बचके’ याच चित्रपटाने वेड लावले आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत २२.५९ कोटींची कमाई केली होती. आठवडाभरानंतर ही हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

‘द केरळ स्टोरी’, ‘स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर-वर्स’ आणि ‘चौक’, ‘रावरंभा’सारखे हिंदी-मराठी सिनेमे तिकीटविक्रीवर तुफान गर्दी खेचत आहेत. पण तरीही विकी कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५.४९ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ७.२० कोटी, तिसऱ्या दिवशी ९.९० कोटी आणि चौथ्या दिवशी ४.१४ कोटींची कमाई केली आहे. विकेंडला ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने २६.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे.

जरा हटके जरा बचके या सिनेमाने आता पर्यंत तब्ब्ल २० कोटींचा आकडा गाठला असून लवकरच हा आकडा ५० कोटी गाठणार असल्याचे चित्र बॉक्सऑफिस वर दिसत आहे. जरा हटके जरा बाके या सिनेमाची निर्मिती ४० कोटींच्या बजेट मध्ये झाली आहे. हा चित्रपट एक पवारपॅक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे. एका जोडप्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. सिनेमात विकी कौशल कपिलच्या तर सारा सौम्याच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतात. मॅड्रॉक फिल्म्स आणि जियो स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात विकी-सारासह ईनामउलहक, नीरज सूद, राकेश बेदी, शारिब हाशमी, सुष्मिता मुखर्जी हे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत आहे.

हे ही वाचा:

महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’चा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

Monsoon पूर्वी चक्रीवादळ होणार दाखल? ‘Biparjoy’ चक्रीवादळाचा धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss