मराठी सिनेसृष्टी नेहमीच नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांसाठी सज्ज असते. त्यात मराठी कलाकारांची मांदियाळी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. अशातच, झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स यांच्या माध्यमातून एक नवी कलाकृती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. झी स्टुडिओज (Zee Studios) आणि कोकोनट फिल्म्स (Coconut Films) निर्मित ‘जिजाई’ (Jijai) हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.
‘सैराट’ (Sairat) च्या अभूतपूर्व यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
याबाबत झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणाले की, ’झी स्टुडिओज नेहमीप्रमाणे नवोदित कलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग असल्याचे जानवलेकर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द..