spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Ashish Shelar Exclusive Interview: आपल्या मित्राला मदत करण्याचा हा राजकीय डाव?

विकासकाम योजना, धोरण याबद्दलच आम्ही बोललो आहोत. कोणाच्या घरात काय चाललंय, कोण कुठे खंजीर खुपसत आहे, कोणी तलवार कुठे ठेवली याच्याबद्दल आम्ही चर्चा करत नाही.

सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडी करणाऱ्या घोषणा करतायेत. सर्व पक्षाकडून राजकीय नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. या निवडणुकीत काय होणार ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. अशातच टाईम महाराष्ट्राच्या वतीने भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांचा Face २ Face interview घेण्यात आला. त्यात अनेक राजकीय गोष्टींचा खुलासा करण्यात आला.

कोकणी माणूस आणि शिवसेनेचे चांगलं नातं आहे. तिथे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे तसेच भाजपवर जोरदार टीका केली. आता जो प्रचार करत आहेत हा प्रचार प्रत्यक्ष राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे मुद्दे बाजूला ठेवून केला जातोय हे किती भूषणावह आहे? असा प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले की, हे अयोग्य आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडूनच हे केले जात आहे. पण भाजपकडून हे केलं जात नाहीये. भाजपचे नेते मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा जे. पी. नड्डा असतील  आमच्याकडून कुठेही भाषणाचा अवधी ३५ ते ४० मिनिटांचा जर असेल तर ७० टक्के वेळ त्यामध्ये आम्ही काय काम केले, त्याच गोष्टींचा समावेश असतो.

पुढे ते म्हणाले की, विकासकाम योजना, धोरण याबद्दलच आम्ही बोललो आहोत. कोणाच्या घरात काय चाललंय, कोण कुठे खंजीर खुपसत आहे, कोणी तलवार कुठे ठेवली याच्याबद्दल आम्ही चर्चा करत नाही. ‘एक है तो सेफ हैं’ हे  रिलेव्हन्ट आहे. कारण ज्यावेळी राहुल गांधी आणि शहरी नक्षलवादी हे म्हणतील की, आम्ही जातीनिहाय जनगणना करण्याचे पुरस्कर्ते आहोत, आम्ही त्याचे विरोधक नाही आहोत. पण त्याचा हेतू जेव्हा लक्षात येतो की, ओबीसीमुळे आम्ही एकत्र आहोत. साळीला किती मिळाले माळीला किती मिळाले कोळीला किती मिळाले जनगणनेच्या आधारावर त्याला दाखवून द्यायचं आणि त्यामध्ये वितुष्ट निर्माण करायचं मग उत्तर आहे की, ‘एक है तो सेफ हैं. एससी म्हणून आपला समाज जर एकत्र असेल मग जातीनिहाय जनगणना करून त्यांच्या डोक्यात हे भरवायचं की, नवबौद्धांना किती मिळालं, चर्मकाराला किती मिळालं. हे वितुष्ट त्यांच्या डोक्यात टाकायचं हे असे म्हणून राहणाऱ्याच्या विरोधात आहे ‘एक है तो सेफ हैं’ हे त्याच्यासाठीच आहे, ही आमची भूमिका आहे आणि आणि म्हणूनच आम्ही हे म्हणत असतो.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील तपासली बॅग, पालघर हेलिपॅडवर झाली तपासणी

लोकांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले, आम्ही काम करतो म्हणून ते…| Avinash Jadhav | MNS | Thane

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss