संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. अशातच मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र (Maharashtra) या दोन्ही ठिकाणी परिणामकारक ठरणारी व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या आशिष शेलार यांची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. यावेळी आशिष शेलार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. भाजपासाठी मुंबईत आशिष शेलार हे न्यूजमेकर आहेत तर महाराष्ट्रासाठी आश्चर्यकारक गुणवत्ता निर्माण करेल इतका सक्षम असणारा हा नेता आहे. वेळोवेळी झालेल्या चुका, वेळोवेळी झालेले मित्र, त्यांचे डावपेच या सर्व गोष्टींना घेऊन फेस टू फेस या टाईम महाराष्ट्रच्या मुलाखतीत आशिष शेलार यांच्याकडून राजेश कोचरेकर यांनी विविध गोष्टी जाणून घेतल्या.
मी माझं काम आणि माझे संबंध याच्यावर मी चाललेलो आहे असं तुमचं म्हणणं आहे. ‘तुमचे संबंध’ मग ते क्रिकेटच्या वर्तुळापासून ते राजकारणापर्यंत असतील. तर याच पार्श्वभूमीवर २३ तारखेच्या निकालानंतर आशिष शेलार कुठे असणार? याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर आशिष शेलार म्हणाले की, महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, अजित दादांची राष्ट्रवादी आणि आरपीआय या चार पक्षाचे नेते अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा नंबर येणारच नाही. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. राहता विषय राहिला माझा तर तेही मी स्पष्ट करतो, यानंतर पक्षाने माझा कुठल्याही पदासाठी विचार करावा अशी माझी मागणी नाही. किंबहुना, माझी मागणी आहे की, माझा विचार करू नये.
पुढे ते म्हणाले की, हे नैराश्य आहे का? असा प्रश्न संपादक राजेश कोचरेकर यांनी विचारला असता शेलार म्हणाले की, नाही. हे होणारच नाही. मी खूप चांगलं काम केलं आहे आणि करतोय आणि याच्यापुढे सुद्धा चांगलं काम करेल पण मला शासकीय, निमशासकीय किंवा अन्य हे माझं मत आहे की पक्षाने यासाठी माझा विचार करू नये. मी संघटनेचे काम करेन. आता तुमच्या पक्षांमध्ये नवीन स्टाईल डेव्हलप झाली आहे का, की मी संघटनेचं काम करेन असं म्हटलं की मग एक पद मिळतं. असं संपादकांनी म्हटल्यावर आशिष शेलार म्हणाले की, मग कोणताच विचार करू नका. मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. सरकारी-दरबारी विचार करू नका. पक्षात विचार करू नका. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार. आमदार म्हणून काम करत राहणार.
हे ही वाचा:
Ashish Shelar Exclusive Interview: आपल्या मित्राला मदत करण्याचा हा राजकीय डाव?
बटेंगे तो कटेंगे म्हणता, मग कटणार कोण ते सांगा, प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल