Avinash Jadhav Exclusive Interview: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टाईम महाराष्ट्राला (Time Maharashtra) दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा केला आहे.
मनसेप्रमुख यांचा विश्वासू साथीदार असेलेले अविनाश जाधव यांच्याविषयी राज ठाकरेंचा असलेल्या विश्वासाबद्दल बोलताना ते म्हणाले, “राजसाहेब महाराष्ट्रासमोरचा एक वेगळा चेहरा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्यासारखं बनायचंय. पण मी नेहमी म्हणतो ते माझे श्रीराम आहेत आणि मी त्यांचा हनुमंत. मग मी श्रीरामासारखं दिसून कसं चालेल? मी हनुमंतासारखा वागायचा प्रयत्न करतो.”
मनसेतील काही नेते अगदी राज ठाकरेंसारखं वागायचं प्रयत्न करतात पण तुम्ही तास कधी करत नाही. पण राज ठाकरेंनी आदेश दिल्यास त्यावर काम करण्यात तुम्ही सर्वात पुढे असतात. म्हणून पक्षात तुमच्यावर दबक्या आवाजात टीका होते, असा प्रश्न विचारला असता अविनाश जाधव म्हणाले, “माझं एकाच म्हणणं आहे राज साहेब बोलले तेखरं आहे. टोलनाका बंद होईल हि संकल्पना या देशात कोणाच्या डोक्यात आली का? आम्हाला १२ वर्षे आगळी. १२ वर्षांचा वनवास होता पण १२ वर्षांनंतर राज्यातले पहिले ६७ आणि आता मोठे पाच टोलनाके बंद झाले. मी जी आंदोलने केली त्या सगळ्यांना सक्सेस आहे. साहेबांनी असं सांगितलं कि एअरटेलची टेल खेचा. आम्ही टेल खेचली तेव्हा आता मराठीत ऐकू येत आहे. मी केलेल्या रेल्वे भरतीच्या आंदोलनात माझ्यामुळे साहेबाना अटक झाली. पण त्यामुळे रेल्वे भरतीच्या जाहिराती राज्यात येऊ लागल्या. अनेक मराठी मुलं रेल्वेत जॉबला लागली. याचा फायदा लोकांना झाला. लोकांमध्ये जनजागृती झाली.”
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…