Exclusive Interview Sada Sarvankar : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. २८८ मतदार संघातील लढतींचा अभ्यास केला तर पहिल्या दहा मतदारसंघाच्या यादीमध्ये माहीम हा मतदार संघ विशेष लक्षवेधी ठरला आहे. हा मतदार संघ अग्रक्रमी ठरला आहे, याचं कारण म्हणजे या मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांनी निवडणूक कुठून लढवायची याबाबत सुरुवातीपासूनच खल सुरू होता. त्यानंतर भाजपने मनसेला दिलेला पाठिंबा असो किंवा मग एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका असो हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यात अमित ठाकरे यांच्यासमोर सदा सरवणकर यांचे आव्हान असणार आहे. याच मुद्द्यावर टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी सदा सरवणकर यांची मुलाखत घेतली.
यावेळी सदा सरवणकर यांना विचारण्यात आले की, फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वर्षा बांगला इथे मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग झाली. तुम्ही आणि एकनाथ शिंदे दोघांनी मिळून फहूल टॉस बॉल टाकला आणि राज ठाकरेंनी मात्र भेट दिली नाही. तर तुमचं हे सर्व ठरलेलं होत आणि राज ठाकरेंना फुल टॉस आऊट करायचे होते? यावेळी सरवणकर म्हणाले की, एकनाथ शिंदे सरळ मनाचे आहेत. काम करण्याची पद्धत ही कपटी नाही. ते म्हणाले की राज ठाकरे आपल्या सर्वांचे मित्र आहेत तुमचे देखील शेजारी आहेत तू जाऊन प्रयत्न कर असं मला सांगण्यात आले. त्यांना सर्व समीकरण समजव. आणि ते जो निर्णय देतील तो मान्य कर. आम्ही ज्या वेळी वर्ष बंगलावर गेलो तेव्हा फक्त चार पदाधिकारी होतो. वर्षा वरती कार्यकर्त्यांचा जोल्लोष आणि उत्साह दाखवून मला प्रेशर आणायचं असत तर दोन पाच हजार लोक सुद्धा घेऊन मी जाऊ शकलो असतो. पण मला तस करायचं न्हवत. त्यांची भावना अत्यंत शुद्ध होती. राज ठाकरे जर म्हणाले तर आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे. मी कधीच एकनाथ शिंदे किंवा बाळासाहेब यांच्या कडे कधी काही मागायला गेलो नाही. लोकांनी निवडून दिल त्यांचं काम करणं हेच मी केलं. मंत्री बनवा , हे करा ते करा यासाठी मि कधीच कोणाकडे गेलो नाही. जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मिळालं असं म्हणत आहे. आणि काम करत राहणं हे माझं कर्त्यव्य म्हणून करत राहिलो असं यावेळी सदा सरवणकर म्हणाले आहेत.
या तिरंगी लढतीमध्ये तुमचा चेहरा हा शांतपणे काम करतो. लोकांची सहानुभूती त्यांना मिळते असं एका बाजूला चित्र ठाकरे गट रंगवतो किंवा ते दिसत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला राजपुत्र अमित मुळे संघर्ष हा करावा लागत आहे. इतकी वर्ष काम केल्यानंतर तुमची माहीम मध्ये दमछाक होते असा प्रश्न विचारला असता सदा सरवणकर म्हणाले आहेत की, आम्ही जेव्हा रॅली किंवा कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा रॅली सुरु होते तेव्हा हजारो लोक आमच्या सोबत सहभागी होतात. आम्हाला कार्यकर्ते आणावे लागत नाही. मी एक खेळाडू आहे आणि ही निवडणूक एक खेळ म्हणून बघतो. त्यावेळी मला असंख्य फोन हेच सांगत होते काही वाटेल ते झालं तरी आपण माघार घ्यायची नाही.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…