मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. २८८ मतदार संघातील लढतींचा अभ्यास केला तर पहिल्या दहा मतदारसंघाच्या यादीमध्ये माहीम हा मतदार संघ विशेष लक्षवेधी ठरला आहे. हा मतदार संघ अग्रक्रमी ठरला आहे, याचं कारण म्हणजे या मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांनी निवडणूक कुठून लढवायची याबाबत सुरुवातीपासूनच खल सुरू होता. त्यानंतर भाजपने मनसेला दिलेला पाठिंबा असो किंवा मग एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका असो हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यात अमित ठाकरे यांच्यासमोर सदा सरवणकर यांचे आव्हान असणार आहे. याच मुद्द्यावर टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी सदा सरवणकर यांची मुलाखत घेतली.
अश्यातच काही दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांना काही दिवसांपूर्वी माहीम मध्ये प्रचार करत असताना महिलांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. या संदर्भात मुलाखतीमध्ये विचारण्यात आले आहे. यावेळी बोलत असताना सदा सरवणकर म्हणाले आहेत की हा रोष न्हवता. मुख्यमंत्र्यांनी एक योजना आणली होती. जे काही बचत गट तिथे त्यांनी स्वयंरोजगार करावा. हे सर्व कुटुंब सक्षम झाले पाहिजे त्यांची भावना चांगली होती. कल्पना चांगली होती. हे सर्व सुरु देखील झालं होत. उदघाटन देखील झालं होत. नंतरच्या काळात काही बचत गटांकडून तक्रारी देखील येऊ लागल्या. तिथे मारामारी झाली गांजा दारू अश्या गोष्टींची विक्री देखील होत आहे. या तक्रारी पोलीस स्टेशन नगरपालिकेत आल्या होत्या. त्यावेळी ऍक्शन देखील घ्यायची होती परंतु त्यावेळी पाऊस आला आणि हे सर्व गोष्टी बंद झाल्या आणि नंतर ते सर्व बंद झालं.
मला ज्या रोषाला सामोरे जावं लागलं तर मला असं वाटतं ते सर्व प्लॅन करून केलं गेलं होत. एक बहीण आत बसली होती एक बाहेर दारात उभी होती. मी नेहमीप्रमाणे हात जोडला. आपल्या दारात आलेल्या माणसाची कास वागायचं हे आपण पाहिलं त्या व्हिडीओ मार्फत. पण कुठल्याही काम नाही झालं तर जाब विचारणं ही गोष्ट मी समजू शकतो. पण यायचं च नाही असं मला सांगितलं. मी त्यांना म्हणत होतो की मी आत यामध्ये येऊन बोलतो आणि समजून सांगतो . कारण पावसाळ्या नंतर तो सर्व प्रकार चालू झाला की नाही या बाबतच च काहीही गोष्ट मला माहित नाही. पण ते सर्व प्लॅन केलं होत. खूप उत्स्फूर्त असा पाठिंबा मला मिळाला होता. आणि ज्या भगिनींनी हे सर्व केलं तिचे पती एका चॅनेल मध्ये काम करतात. त्यामुळे मला असं वाटत की त्याचा फायदा घेऊन हे सर्व केलं आहे. त्या सर्व वसाहतीमध्ये पाण्याच्या लाईन दिल्या, वसाहती मध्ये जी काही नागरी काम लागतात ती सर्व नागरी काम केली आहेत. परंतु एक माणसाला बदनाम करण्यासाठी हा लोकांचा रोष आहे. त्यामुळे मला असं वाटत अश्या गोष्टींकडे किंवा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…