विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली. यावेळी नजीब मुल्ला यांनी टाईम महाराष्ट्रसोबत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. कळवा-मुंब्रा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यात कांटे की टक्कर आहे. त्यानिमित्ताने Face 2 Face मध्ये नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्याबद्दल धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.
मुंब्रा ते मुस्लिम मांडवी इतका जितेंद्र आव्हाडांचा प्रवास आहे. नेहमीच नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्याला-खांदा लावून उभे राहिले आहेत. मतदारसंघ ते क्रिकेट क्लब अशी जितेंद्र आव्हाड यांची सोबत करणारे नजीब मुल्ला आज आव्हाड यांच्याचसमोर आव्हान म्हणून उभे आहेत. असं का घडलं ? असा प्रश्न विचारला असता, नजीब मुल्ला म्हणाले की, मी निःस्वार्थीपणे सर्व करत राहिलो. सहकारी म्हणून जमेल ते केलं. मी कॉलेज जीवनापासून मांडवी क्रिकेट क्लबसोबत जोडलो गेलो आहे. अडी-अडचणीच्या काळात मी खंबीरपणे काम करत राहिलो. २००९ ची निवडणूक झाली तेव्हा सगळे बोलले नजीब नसता तर जिंकणं अवघड होतं. तिथेच आमच्यात पहिली ठिणगी पडली. पण त्या लोकांबद्दल मला आश्चर्य वाटायचं की, मी प्रामाणिक काम करणारा नेता आहे. मला जे काही पाहिजे असेल तर ते मी मागून घेतो. मी जनतेच्या मागून काही उद्योग करत नाही. राजकीय सुरक्षेसाठी, त्यांना त्यांच्या मतदारसंघात सक्षम करण्यासाठी मी अनेक पदांचे बलिदान दिले. असे सांगत ते म्हणाले की, सय्यद अलींना मायनॉरिटीची काहीतरी कमिटमेंट देण्यात आली होती. मधुकर पिचड यांनी त्यावेळी ठरवलं होतं की, मायनॉरिटी कमिशनची चेअरमनशिप नसीम सिद्दीकीला द्यायची किंवा मराठी मुसलमानांना द्यायचे. तेव्हा मला सांगण्यात आले की, तू मायनॉरीटीचे काम कर. पण मला कधीच महामंडळ किंवा शासकीय पदं घेण्यात काही रस नव्हता. मला निवडणूक आणि निवडून येणाऱ्या पदांमध्ये जास्त रस होता. मला सांगण्यात आलं की, आम्ही सय्यद अलींना कमिटमेंट दिली आहे. तू निवडून आल्यावर आणि अध्यक्ष झाल्यावर मला मतदारसंघात त्रास होईल. एकदा आम्ही असंच बसलो होतो तेव्हा बोलले की, तू मधुकर पिचड यांच्याकडे जाऊन मला हे पद न देता सिद्दीकी यांना द्या असे सांग. या सर्व प्रकारातून मला एक समजलं की, कार्यकर्ता मोठा होतोय असं म्हटल्यावर त्यांना आनंद व्हायचा नाही. जे-जे त्यांच्यासोबत मोठे झाले त्यांच्याबाबत त्यांना इनसिक्योरिटी वाटायची. खूप उशिरा मला समजले की, त्यांचा स्वभाव लोकांना दाबून ठेवणे असा आहे. यासोबतच, नजीब मुल्ला यांनी सांगितले की, प्रताप सरनाईक का गेले याचा साक्षीदार मी आहे. प्रताप सरनाईकांशी बोलायला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी मला आणि जितेंद्र आव्हाडांना पाहिले आणि तेव्हा ते रागाने गाडीत बसून गेले. मला प्रताप सरनाईकांनी सांगितले होते की, तू मध्ये पडू नको, तू खूप मोठी चूक करत आहेस. पण मला माझी चूक खूप उशिरा समजली. त्यातून मला एक गोष्ट समजली की, कोणीही पुढे जात असेल तर त्यांना नेहमी वाटायचं की समोरची व्यक्ती एवढी सक्षम कशी होतेय? कार्यकर्ता आणि सहकारी जर सक्षम होत आहेत, नजीबसारखा आपला विश्वासू सक्षम होत असेल तर, शेवटी फायदा त्यांनाच होणार आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जर कोणीही सक्षम होत असेल तर त्यांना इनसिक्योरिटी वाटायची, हे मी अनुभवलं आहे, असा खुलासा नजीब मुल्ला यांनी केला.
शरद पवार यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांना काय वाटतं? याबाबत बोलताना नजीब मुल्ला म्हणाले की, ते पवार साहेबांबाबत खूप काही बोलायचे. मी निवडणुकांनंतर त्याबद्दल बोलेनच. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. जितेंद्र आव्हाड आणि माझा संवाद १९९७ पासून आहे. दबंग चित्रपटात दाखवल्याप्रमाणे चुलबुल पांडे आणि खऱ्या आयुष्यातील सलमान खान यांमध्ये फरक आहे ना? तसं त्यांचं आहे. कॅमेऱ्यासमोर ते वेगळं बोलतात आणि रियालिटी वेगळी आहे. त्यांच्यावर केस झालेली तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा पवार साहेबांनी त्यांना मदत केली नाही. गोपीनाथ मुंडे यांनी आणि डावखरे साहेबांनी त्यांना मदत केली. त्यांचं काम हे प्रेमापुरती होतं. त्यांना मंत्रिपद हवं होतं. ज्यांनी-ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांनी त्यांचीच वाट लावली. त्यांना त्यांच्या बोटावर चालणारी माणसं हवी असतात. ते पवार साहेबांबाबत खूप काही बोलायचे. मी निवडणुकांनंतर त्याबद्दल बोलेनच. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. जितेंद्र आव्हाड आणि माझा संवाद १९९७ पासून आहे. दबंग चित्रपटात दाखवल्याप्रमाणे चुलबुल पांडे आणि खऱ्या आयुष्यातील सलमान खान यांमध्ये फरक आहे ना? तसं त्यांचं आहे. कॅमेऱ्यासमोर ते वेगळं बोलतात आणि रियालिटी वेगळी आहे. त्यांच्यावर केस झालेली तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा पवार साहेबांनी त्यांना मदत केली नाही. गोपीनाथ मुंडे यांनी आणि डावखरे साहेबांनी त्यांना मदत केली. त्यांचं प्रेम हे कामापुरती होतं. त्यांना मंत्रिपद हवं होतं. ज्यांनी-ज्यांनी त्यांना मदत केली. चॅनलवर बोलणारे आणि मागे बोलणारे वेगळे असतात. अजित पवार यांना कार्यकर्ता मोठा झालेला आवडतो. आव्हाड यांनी मला त्यांच्या घरी बोलावून सांगितलं होतं की, कदाचित आपल्याला राष्ट्रवादीचा वेगळा गट पाडायला लागेल. तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. नंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला आणि मी अजितदादा यांच्यासोबत येऊन कामं केली. कारण; मला स्वतःवर विश्वास होता.
सुरज परमार या प्रकरणात अजित पवार यांनी तुम्हाला तारलं आणि बाकी मारलं. तेव्हा नेमकं काय घडलं होतं? ठाण्यातील, मुंब्रा-कळवा या मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील जनतेला याबद्दल काय सांगाल? असं विचारलं असता नजीब मुल्ला म्हणाले की, चॅनेलवर वेगळंच दाखवलं गेलं. अजित दादांपेक्षा तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे यांनी वाचवलं कारण त्यांना सत्य माहित होतं. जगदाळे साहेबांनी मला चांगली साथ दिली. परमार प्रकरणात माझी चूक नव्हती. हा प्रकार घडल्यावर ते फडणवीसांच्या हात जोडून पाया पडले होते, त्यांना माहिती होतं की जर ते यात अडकले तर त्यांना अटक होऊ शकते. कल्याणच्या कोर्टात गेल्यावर त्यांनी माझ्याबद्दल एकही शब्द काढला नाही. आव्हाड साहेब यांनी फडणवीस यांची ऍक्टिंग तेव्हा करून दाखवली होती. जीवनात प्रामाणिक प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. आव्हाडांना वाटलं होतं की, नजीबला आता पोलीस टायरमध्ये टाकून मारतील. त्यांना वाटलं होतं की, नजीब त्यांचं नाव घेईल. पण तसं झालं नाही. मग वाटलं हा माणूस फक्त स्वार्थासाठी जगतोय, मग का त्याच्यासोबत राहायचं?
२०१२ ला जेव्हा नजीब मुल्ला की एच.एस. पाटील असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी तुम्हाला महापौर करण्यात जितेंद्र आव्हाड प्रामाणिक होते का? याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यावर नजीब मुल्ला म्हणाले की, हो तेव्हा ते प्रामाणिक होते. आर्थिकदृष्टया मला पाहिले असता, माझी छबी पहिली असता त्यांना समजलं की मी किती भयानक आहे. त्यांना तेव्हा निवडून येऊन तीन वर्ष झाली होती. मतदानाच्या दिवशी राज ठाकरे यांनी तेव्हा पाठिंबा जाहीर केला होता. २० जानेवारी २०१२ ला आनंद परांजपे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. ५ मार्चला राज ठाकरे ३ आमदारांना भेटले होते.
नजीब मुल्ला नेमका काय आहे? आव्हाडांच्या पायाचा दगड होणारा आहे, त्यांना आमदार करणारा आहे की कोणत्याही पक्षातील नेत्यांना आपला वाटणारा नजीब मुल्ला आहे? ठाण्याच्या सत्तेतील मॅनेजर आहे की एक तरुण नेता आहे? नजीब मुल्ला नक्की आहे तरी कोण? या प्रश्नावर बोलताना नजीब मुल्ला यांनी सांगितले की, माझा बिझनेस आहे पण मी कधी टेंडरमध्ये इंटरफेयर केले नाही. लोकांना आपला वाटतो कारण मी प्रामाणिक आहे. नजीब मुल्ला सर्वांना आपलासा वाटण्याचे कारणच आहे की, मी प्रामाणिक आहे. कितीही राजकीय वाद-विवाद असले तरीही सर्वांना माहिती आहे. मी विरोधाला विरोध केला आहे. मी कधी कोणत्या कामासाठी पैसे घेतले नाही. पैशांचं वजन ठेवल्यावर मी शब्द फिरवत नाही.
हे ही वाचा:
Pimpri Assembly constituency: पिंपरी विधानसभेच्या रिंगणात कोण ठरणार अव्वल? । Anna Bansode