लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचार सभा थंडावल्यानंतर आता पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सभांचा जोर लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर रत्नागिरी आणि पुण्यात तोफ धडकली होती पण आज थेट मुंबईत ही तिसरी सभा पार पडत आहे. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी कळवा येथे “राज ठाकरे”(Raj Thackeray)यांची आज सभा पार पडत आहे.
तब्ब्ल १९ वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेनेच्या मंचावर उपस्थित राहिले आहेत. ठाण्यात येऊन आनंद मठात आनंद दिघे यांचं दर्शन घेतल्यानंतर जुने दिवस आठवायला लागले. “माझे आणि आनंद दिघेंचे वेग मैत्रीपूर्ण संबंध नाते होते. आज गेल्या नंतर लक्षातच आलं नाही की याच वास्तुमध्ये मी फिरायचो. बाळासाहेबांसोबत मी या परिसरात येत असायचो.”अस म्हणत राज ठाकरेंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज कल्याण लोकसभेची निवडणुक आहे. तुम्ही किती ही विकास करा पण बाहेरचे लोंढे येणं थांबणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे येथे ७ ते ८ महानगरपालिका आहेत. प्रत्येक राज्यातील लोक महाराष्ट्रात मराठी भाषा बोललीच गेली पाहिजे.”
“मी पहिली लोकसभेची निवडणुक पाहिली ज्यात विषयच नाही. या निवडणुकीत कोणताही विषय नसल्याने आई-बहिणीवरुन उद्गार काढतात.आता कशाावरुन निवडणूक सुरु आहे तर वडील चोरले. फोडोफाडीचं राजकारणं मला कधीही जमलं नाही. जर पहिल्यांदा कोणी राजकारणाची सुरुवात केली असेल तर शरद पवारांनी केली आणि पुलोदची स्थापना केली. त्यावेळी सेनेचे खासदार फोडण्याचं काम शरद पवारांनी केली. आज छगन भुजबळांना फोडलं ते आज इथे असते.नारायण राणेंसोबत आमदार घेऊन कॉंग्रेसने पवारांनी फोडली. मशिदीतून फतवे काढलेत कॉंग्रेसला मतदान करा.”असं म्हणत संजय राऊत यांच्यासह शरद पवारांवर घणाघाती टीका केली.
पुढे ते म्हणाले की,”ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारेंना तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या करता. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रीमंडळात बसता तेव्हा लाज वाटत नाही.”अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा “लाव रे तो व्हिडिओ” करत जोरदार टीका केली. “बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे कितीही चढउतार आले तरी मार्ग काढेन.सेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं का नाही बोललात? निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही सांगता की अडीच वर्षाचा करार होता तर त्या आधी का सांगितलात नाही?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी विचारला.
हे ही वाचा:
‘एक अकेला सब पे भारी’ बोलणारे सत्ता जाण्याच्या भीतीने… Sachin Sawant यांचा PM Modi यांना खोचक टोला
पुलवामाच्या हल्ल्याला जबाबदार कोण? Uddhav Thackeray यांचा PM Modi यांना सवाल
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.