spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

… या सर्व गोष्टींमुळे मोहित कंबोज यांचं राजकीय नाव खराब झालंय?, उत्तर देत म्हणाले…

मुंबई भाजपमध्ये जेव्हा काही विशिष्ट नेत्यांकडे जबाबदारी होती तेव्हा तुम्हाला मुंबईच्या भाजपच्या समितीमधून किंवा त्या पदांवरून काहीसे दूर ठेवण्यात आले होते

१२ ऑक्टोबर २०२४ ला मुंबईतील एक प्रथितयश नेते राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर मुंबई पोलिसांना अजून म्हणावे तसे या हत्येतील आरोपी पकडता आलेले नाही. हे वास्तव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळेल अश्या पद्धतीच नाव या सगळ्या प्रक्रिया मध्ये समोर आलं आहे. अर्थात काही उतावळ्या माध्यमांनीं हे सगळं सुरु केलं पण आता याच उतावळ्या माध्यमाने चालवलेल्या ब्रेकिंग न्युजमुळे काही जण नक्की ब्रेक होण्याची भीती निर्माण झालेली आहे. पण ज्या नेत्याचं नाव किंवा ज्या व्यक्तीच नाव या संदर्भामध्ये पुढे आलाय तो हायप्रोफाईल नेता सध्या आपल्या बरोबर आहे. याच विषयाला अनुसरून भाजपचे नेते आणि गृहमंत्री मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अनुमान समजल्या जाणाऱ्या मोहित कंबोज यांची रोख ठोक अशी मुलाखत टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली आहे.

यावेळी बोलत असताना मोहित कंबोज यांना अनेक प्रश्न हे विचारण्यात आले आहेत. मुंबई भाजपमध्ये जेव्हा काही विशिष्ट नेत्यांकडे जबाबदारी होती तेव्हा तुम्हाला मुंबईच्या भाजपच्या समितीमधून किंवा त्या पदांवरून काहीसे दूर ठेवण्यात आले होते तरी तुम्ही काम करत होतात लोकसभा विधानसभेमध्ये महत्त्वाची भूमिका पडद्याआड राहून तुम्ही बजावली . या सगळ्या गोष्टींमुळे आणि मीडियामध्ये तुमचं नाव चर्चेत आल्यामुळे तुमचं राजकीय नाव खराब होईल असं तुम्हाला वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देत असताना मोहितंबस मिळाले की, माझं कोणतंही नाव खराब होणार नाही. कोणी काही दाखवलं नाही किंवा कोणी काही छापल्याने किंवा कोणताही चॅनलने काही खोटं सांगितलं नाही माझं कोणतंही नुकसान हे होत नाही. या सर्व गोष्टींनी मला कोणताही फरक पडत नाही. आता सध्या एवढा सोशल मीडियाचा वापर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिण्याचा बोलण्याचा जो काही संविधान लिहिले आणि आपल्याला अधिकार दिले परंतु काही लोक या गोष्टींचा दुरुपयोग करतात परंतु त्यामुळे माझं चरित्र खराब होईल असे मला अजिबात वाटत नाही आणि शेवट जेव्हा होईल जेव्हा त्याचा दोषी मी असेल परंतु मी कोणत्याही गोष्टीचा दोषी नाही आतापर्यंत ज्या काही गोष्टींसाठी प्रयत्न करण्यात आले त्या कोणत्याही गोष्टी आतापर्यंत सफल झालेले नाहीत या सर्व गोष्टींची सुरुवातच खोट्याने सुरू होते आणि फार काळ टिकत नाही. खोटं हे त्रास देऊ शकतो परंतु हरू शकत नाही आणि हे सर्व करून कोणाला दोन-तीन तासांचा टीआरपी ची मज्जा घ्यायची असेल तर घेऊ द्या मग ते डिलीट का करताय ठेवू शकता तुम्ही. असं म्हणत रोख होणे मोहित कंबर यांनी त्यांचं उत्तर हे स्पष्टपणे मांडला आहे.

Latest Posts

Don't Miss