spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या संदर्भात मोहित कंबोज यांचा उल्लेख होण हे कितपत योग्य?

१२ ऑक्टोबर २०२४ ला मुंबईतील एक प्रथितयश नेते राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर मुंबई पोलिसांना अजून म्हणावे तसे या हत्येतील आरोपी पकडता आलेले नाही.

१२ ऑक्टोबर २०२४ ला मुंबईतील एक प्रथितयश नेते राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर मुंबई पोलिसांना अजून म्हणावे तसे या हत्येतील आरोपी पकडता आलेले नाही. हे वास्तव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळेल अश्या पद्धतीच नाव या सगळ्या प्रक्रिया मध्ये समोर आलं आहे. अर्थात काही उतावळ्या माध्यमांनीं हे सगळं सुरु केलं पण आता याच उतावळ्या माध्यमाने चालवलेल्या ब्रेकिंग न्युजमुळे काही जण नक्की ब्रेक होण्याची भीती निर्माण झालेली आहे. पण ज्या नेत्याचं नाव किंवा ज्या व्यक्तीच नाव या संदर्भामध्ये पुढे आलाय तो हायप्रोफाईल नेता सध्या आपल्या बरोबर आहे. याच विषयाला अनुसरून भाजपचे नेते आणि गृहमंत्री मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अनुमान समजल्या जाणाऱ्या मोहित कंबोज यांची रोख ठोक अशी मुलाखत टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली आहे.

यावेळी बोलत असताना मोहित कंबोज यांना अनेक प्रश्न हे विचारण्यात आले आहेत. बाबा सिद्दिकी हे असे एक नेता होते की ज्यांचे एकाच वेळेस तीन खान हे मित्र होते म्हणजेच सलमान खान अमीर खान शाहरुख खान तसेच 35 – 36 आमदारांपैकी सर्वात हाय प्रोफाईल आमदार त्यांच्या हत्येच्या संदर्भात मोहित कंबोज यांचा उल्लेख होण हे कितपत योग्य? या ठिकाणी तर एखादा सामान्य व्यक्ती असतात तर तो घाबरून गेला असता परंतु तुमच्या मध्ये एखादी शक्ती आहे या शक्तीच्या आधारे तुम्ही हे सर्व फेस करत आहात की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात? या प्रश्नाला उत्तर देत मोहित कंबोज म्हणाले आहेत की, आरोप किंवा निर्दोष या गोष्टींचा काही संदर्भ नाही आहे कारण आरोप कोणत्या गोष्टीचा किंवा निर्दोष कोणत्या गोष्टीचा? बाबा सिद्दिकी यांच्या संदर्भात ही जी घटना झाली तेव्हा सर्वात आधी रुग्णालयात पोहोचणाऱ्यां पैकी मी एक आहे. आमची मैत्री ही जवळपास 15 वर्ष जुनी मैत्री आहे झिशान हा माझ्या भावासारखा आहे. झिशान जे काही स्टेटमेंट दिलं ते मराठी मध्ये आहे सर्व पत्रकारांनी ते एकदा नीट वाचावे आणि त्यामध्ये माझ्यावर कुठे आरोप लावले आहेत हे देखील स्पष्ट करावे. प्रत्येक नेत्याची म्हणा किंवा सामान्य व्यक्तीची एक डायरी असते आणि त्या डायरीमध्ये आपण कोणाला भेटणार किंवा काय काम करणार हे लिहिलं जातं माझी सुद्धा एक डायरी आहे मी आज कोणाला भेटणार हे लिहिले आहे आणि त्याच प्रमाणे त्यांची सुद्धा डायरी होती आणि त्यामध्ये त्यांनी माझं नाव लिहिले आहे तसेच झिशान याने देखील स्टेटमेंट मध्ये इतका सांगितला आहे की ते मोहित यांना भेटणार आहे त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा तर भेटत नाहीये आत्तापर्यंत हजारो वेळा त्यांना भेटलो आहे. आणि या सर्व मधून खळबळ जनक असं काय मिळू शकतो किंवा एखाद्या वाढू शकतो या पद्धतीचा जर का धंदा चालू केला असेल तर आमच्याकडे सुद्धा कायदेशीर पद्धती आहे तर ती आम्ही वापरू.

 

Latest Posts

Don't Miss