राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी टाईम महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत काही राजकीय गोष्टींचा खुलासा झाला आहे.
सुरज परमार (Suraj Parmar) या प्रकरणात अजित पवार यांनी तुम्हाला तारलं आणि बाकी मारलं. तेव्हा नेमकं काय घडलं होतं? ठाण्यातील, मुंब्रा-कळवा या मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील जनतेला याबद्दल काय सांगाल? असं विचारलं असता नजीब मुल्ला म्हणाले की, तो चुलबुल पांडे पार्ट २ होता. दाखवणारा वाघ बिळात जाऊन बसला होता. चॅनेलवर वेगळंच दाखवलं गेलं. अजित दादांपेक्षा तेव्हा मला एकनाथ शिंदे यांनी वाचवलं. कारण त्यांना सत्य माहित होतं. जगदाळे साहेबांनी मला चांगली साथ दिली. परमार प्रकरणात माझी चूक नव्हती. परमार प्रकरणात मी जी भाषणं केली त्याचा महानगरपालिकेचा ऑन रेकॉर्ड फायदा झालेला आहे. पण माझी भाषणं चुकत होती, ती वेळ चुकत होती.
हा प्रकार घडल्यावर ते फडणवीसांच्या हात जोडून पाया पडले होते, त्यांना माहिती होतं की जर ते यात अडकले तर त्यांना अटक होऊ शकते. कल्याणच्या कोर्टात गेल्यावर त्यांनी माझ्याबद्दल एकही शब्द काढला नाही. आव्हाड साहेब यांनी फडणवीस यांची ऍक्टिंग तेव्हा करून दाखवली होती. जीवनात प्रामाणिक प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. आव्हाडांना वाटलं होतं की, नजीबला आता पोलीस टायरमध्ये टाकून मारतील. त्यांना वाटलं होतं की, नजीब त्यांचं नाव घेईल. पण तसं झालं नाही. मग वाटलं हा माणूस फक्त स्वार्थासाठी जगतोय, मग का त्याच्यासोबत राहायचं? जितेंद्र आव्हाड या परिस्थितीही स्वतःचा विचार करतो.
हे ही वाचा:
Kesarkar, Rane यांचा रविंद्र Chavan यांना त्रास, Vishal परब काय करतायत? | Devendra Fadanvis