Najeeb Mulla Exclusive Interview: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी टाईम महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत काही राजकीय गोष्टींचा खुलासा झाला आहे.
आव्हाडांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचे तुम्ही साक्षीदार आहात. तुमच्या मैत्रीमध्ये किंवा राजकीय वाटचालीमध्ये सर्वात सुखद क्षण कोणता आहे? हा प्रश्न विचारला असता नजीब मुल्ला यांनी सांगितले की, आमच्या मैत्रीत एकच सुखद क्षण आहे. तो म्हणजे २००९ ला सह्याद्री शाळेत काउंटिंग चालू होते. तेव्हा जितेंद्र आव्हाड ११ ते १२ हजार मतांनी मायनसमध्ये होते. तेव्हा मी हेमंत वाणी यांच्याकडे असलेल्या फोनने आव्हाडांना फोन केला आणि सांगितले की, तुम्ही तयार रहा, आपण जिंकलो. त्यावर जितेंद्र आव्हाड मला म्हणाले, आपण मायनसमध्ये आहोत , तू असे कसे बोलतोय. त्यावर मी प्रतिक्रिया दिली, मुंब्र्याच्या जनतेनेवर माझा विश्वास आहे. मुंब्र्यात काय मतदान केलंय हे मला माहितेय. अपेक्षेपेक्षा जास्त मुंब्र्याच्या लोकांनी प्रेम दिले. नॉन पॉलिटिकल लोकांची टीम जुळवून मी ते युद्ध लढलो. आजपण मी तेच करतोय.
आजपण मुंब्रा तुम्हाला १०० टक्के साथ देईल असे विचारल्यावर नजीब मुल्ला म्हणाले, मुंब्रा १०० टक्के साथ देईल पण त्याचबरोबर कळवा शुद्ध यावेळी साथ देणार. यासाठी शिवसेना आणि बीजेपीचे मी मनापासून आभार मानतो. आमच्या मैत्रीमध्ये त्यावेळी जो सुखाचा क्षण होता तो अपेक्षेपेक्षा जास्त होता. तेव्हा जितेंद्र आव्हाड चांगल्या मतांनी जिंकून आले. तेच जितेंद्र आव्हाड मला म्हणाले की, मी मंत्री झालो तर अर्धी लाल बत्ती तुझी असेल. तेव्हा तो सर्वात आनंदाचा क्षण होता.
हे ही वाचा:
Kesarkar, Rane यांचा रविंद्र Chavan यांना त्रास, Vishal परब काय करतायत? | Devendra Fadanvis