spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Najeeb Mulla Exclusive Interview: पवारांच्या पाठीमागे आव्हाड काय काय बोलायचे याला मी साक्षी आहे – Najeeb Mulla

आव्हाडांवर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल होता तेव्हा संयुक्त काँग्रेस होती, दोन ते तीन महिन्यातच त्यांना प्रदेश युवक काँग्रेसमधून काढण्यात आले होते. त्यावेळेला त्यांना गोपीनाथ मुंडेंनी मदत केली होती. तेव्हा शरद पवारांनी त्यांना मदत केली नाही असा रोष लावला होता.

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडी करणाऱ्या घोषणा करतायेत. सर्व पक्षाकडून राजकीय नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. अशातच टाईम महाराष्ट्राच्या वतीने कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले नजीब मुल्ला यांची मुलाखत घेण्यात आली. टाईम महाराष्ट्राच्या संपादकांनी नजीब मुल्ला हे ठाण्याच्या राजकारणातले कॅलिडोस्कोप आहेत अशी उपमा दिली. कॅलिडोस्कोप म्हणजे काचेच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वेगवेगळे आकार आणि रंग बघायला मिळतात. नजीब मुल्ला हे ते एक व्यक्तिमत्त्व आहे.

शरद पवार गेली ६० वर्षे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काम करतायेत त्यांचा जितेंद्र आव्हाडांवर आंधळा विश्वास आहे. सर्वोच्च नेत्याकडे आपण सुरक्षित असताना सुद्धा त्यांना तुमची किंवा तुमच्यासारख्या सहकाऱ्यांची भीती का वाटते? हा प्रश्न विचारला असता नजीब मुल्ला यांनी उत्तर दिले की, शरद पवारांचा त्यांच्यावर विश्वास होता, त्यांचा शरद पवारांवर होता का? एखादी गोष्ट जर त्यांना नाही मिळाली तर ते समोरच्याला काय बोलायचे याची मी साक्ष आहे. नजीब मुल्ल्यांच्या या वक्तव्यावर टाइम महाराष्ट्राचे संपादक विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. त्यावर नजीब मुल्ला यांनी अंतर्गत खुलासे केले. ते म्हणाले की, आव्हाडांचा आणि माझा सहवास १९९७ पासून आहे. तेव्हा मी जोशी बेडेकर कॉलेजचा यूआर होतो. त्याच्यानंतर त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा उदाहरण देताना नजीब यांनी सलमान खानच्या चुलबुल पांडे या भूमिकेबद्दल उदाहरण दिले. चित्रपटात असणारे पात्र आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये असणारे खरं पात्र यात जसे फरक असतो तसे जितेंद्र आव्हाडांचे आहे. ते कॅमेरासमोर एक आणि कॅमेरामागे एक असे वागतात, असा खुलासा नजीब मुल्ला यांनी केला.

पुढे नजीब मुल्ला म्हणाले की, आव्हाडांवर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल होता तेव्हा संयुक्त काँग्रेस होती, दोन ते तीन महिन्यातच त्यांना प्रदेश युवक काँग्रेसमधून काढण्यात आले होते. त्यावेळेला त्यांना गोपीनाथ मुंडेंनी मदत केली होती. तेव्हा शरद पवारांनी त्यांना मदत केली नाही असा रोष लावला होता. तेव्हा ते काय बोलायचे हे फक्त मलाच माहितेय. निराशेमध्ये ते काय बोलायचे याला मी साक्ष आहे. नंतर पक्षाची स्थापन झाली. त्यांना महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष व्हायचे होते. तेव्हा रणजितसिंग मोहिते-पाटील यांना अध्यक्ष करण्यात आले. तेव्हा ते शरद पवारांवर खूप चिडले होते. त्यावेळेला वसंत डावखरे यांच्या बाजूने झुकते माप मिळाले की ते शरद पवारांवर काय रोष करायचे याची मी साक्ष आहे. त्यानंतर गणेश नाईक यांनाही शरद पवारांकडून झुकते माप मिळाले तर ते विठ्ठल मानणाऱ्या शरद पवार यांना कटू शब्दांनी हिणवायचे याची मी साक्ष आहे, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले.

हे ही वाचा:

…मला कसलंही श्रेय नकोच | Shrikant Shinde vs Raju Patil | MNS | Raj Thackeray

Pimpri Assembly constituency: पिंपरी विधानसभेच्या रिंगणात कोण ठरणार अव्वल? । Anna Bansode

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss