मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालीये. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडी करणाऱ्या घोषणा करतायेत. सर्व पक्षाकडून राजकीय नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. अशातच टाईम महाराष्ट्राच्या वतीने कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले नजीब मुल्ला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी बऱ्याच अंतर्गत राजकीय कुरबुरींची माहिती दिली.
मुलाखतीत नजीब मुल्ला म्हणाले की, २००९ ला निवडून आल्यानंतर लोकांचं असं म्हणणे होते की, नजीब नसते तर आव्हाड जिंकून आले नसते. या वाक्यावरच पहिली ठिणगी वाजली. पण त्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं की, मी प्रामाणिक काम करणारा नेता आहे, मला काहीपण पाहिजे असेल तर ते मागून घेतो. मी जनतेच्या मागून काही उद्योग करत नाही. राजकीय सुरक्षेसाठी, त्यांना त्यांच्या मतदारसंघात सक्षम करण्यासाठी खूप काही पदांचे बलिदान दिले. पुढे ते म्हणाले की, सय्यद अलींना मायनॉरिटीची काहीतरी कमिटमेंट दिली होती आणि मधुकर पिचड यांनी त्यावेळी ठरवलं की, मायनॉरिटी कमिशनची चेअरमनशिप नसीम सिद्दीकीला द्यायची किंवा मराठी मुसलमानांना द्यायचे. तेव्हा मला सांगण्यात आले की, तू मायनॉरीटीचे कर. पण मला कधीच महामंडळ किंवा शासकीय पदं घेण्यात काही रस नव्हता. मला निवडणूक आणि निवडून येण्यात जास्त रस होता. मला सांगण्यात आले की, आम्ही सय्यद अलींना कमिटमेंट दिली आहे. तू निवडून आल्यावर, अध्यक्ष झाल्यावर मला मतदारसंघात त्रास होईल. एकदा आम्ही असेच बसले असताना बोलले की, तू मधुकर पिचड यांच्याकडे जाऊन मला हे पद न देता सिद्दीकी यांना द्या असे सांग. या सर्व प्रकारातून मला एक समजले की, कार्यकर्ता मोठा होतोय म्हटल्यावर त्यांना आनंद नाही व्हायचा, जे-जे त्यांच्यासोबत मोठे झाले की, त्यांना इनसिक्योरिटी वाटायची. खूप उशिरा मला समजले की त्यांचा स्वभाव लोकांना दाबून ठेवणे आहे.
पुढे ते म्हणाले की, प्रताप सरनाईक का गेले याची साक्ष मी आहे. प्रताप सरनाईकांशी बोलायला मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला आणि जितेंद्र आव्हाडांना पाहिले आणि रागाने गाडीत बसून गेले. मला प्रताप सरनाईकांनी सांगितले होते की, तू मध्ये पडू नको, तू खूप मोठी चूक करतोय. पण मला माझी चूक उशिरा समजली. मला एक गोष्ट समजली की, कोणीही पुढे जात असेल तर त्यांना नेहमी वाटायचे की समोरची व्यक्ती एवढी सक्षम कशी होतेय. कार्यकर्ता आणि सहकारी जर सक्षम होत आहेत, नजीबसारखा आपला विश्वासू सक्षम होतोय तर शेवटी फायदा त्यांनाच होणार आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जर कोणीही सक्षम होत असेल तर त्यांना इनसिक्योरिटी वाटायची, असा खुलासा नजीब मुल्ला यांनी टाईम महाराष्ट्रसोबत संवाद साधताना केला.
हे ही वाचा:
Shrikant Shinde यांची कळ का काढता? Raju Patil म्हणाले… Interview | MNS | Raj Thackeray
NCP नेते नजीब मुल्ला फेस टू फेस Time Maharashtra वर । Najib Mulla