New India Bank Scam: गेली काही वर्ष मुंबई किंवा महाराष्ट्र बंद ठेवायचा ठेका जणू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडे होता. परंतु त्याच्याही आधी मुंबई बंद म्हंटली कि बंद व्हायची तो माणूस म्हणजे कामगार नेते जार्ज फनांडिस त्यामुळेच जॉर्ज फर्नांडीस यांना बंद सम्राट देखील म्हटलं जायचं. याच जॉर्ज फर्नांडीस यांनी ५७ वर्षांपूर्वी एका बँकेची स्थापना केली. त्या बँकेचं नाव होत न्यू इंडिया सहकारी बँक. मूळत: कष्टकऱ्यांना मदत करण्यासाठी, टॅक्सी चालकांना अर्थसाह्यय करण्यासाठी एक आपली हक्काची आपुलकी जपणारी बँक असावी हा त्या बँक स्थापनेमागचा उद्देश होता.तीच बँक काळाच्या ओघात मोठी झाली. इतकी मोठी झाली कि त्याच्यात रिसर्व्ह बँकेचे डोळे पांढरे पडतीलअसा भ्रष्टाचार घडला. नेमकं काय घडलं या न्यू इंडिया कॉ operative बँकेसोबत? तेच मी आपलयाला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे.
न्यू इंडिया बँकत झालेल्या घोटाळ्यामुळे हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. RBI ने बँकेवर ६ महिन्याकरिता कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये कोणत्याही खातेधारकाला ६ महिन्यापर्यंत व्यवहार करता येणार नाही आहे. पण हे पाप कोणाचे आहे? तर हितेश मेहता नावाच्या माणसाचे. हा हितेश मेहता नेमका आहे तरी कोण? तर, हा माणूस बँकेच्या क्लार्क पासून तर जेनेरल मॅनेजर पर्यंत पदन्नोती झालेला बँकेचाच कर्मचारी. आज तो बँकेच्या घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहे. आज तो इतका शरमलेला आहे. कि त्याने पोलिसांच्या कचाट्यात असताना आपली मान वर देखील केलेली नाही. मात्र, त्याच्या या कृष्णकृत्यामुळे हजारो कुटुंबियांना आपली मान खाली घालावी लागणार का? असा प्रश्न उपस्तिथ झाला आहे.
हितेश मेहता याने न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँकेत क्लार्क म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. एका छोट्या पदापासून ते बँकेचा जनरल मॅनेजर पर्यंतचा त्याचा प्रवास जितका थक्क करणारा आहे तितकाच त्याचा भ्रष्टाचार घोटाळा कुणाचेही डोळे विस्फारून टाकणारा आहे. या हितेश मेहता कडे दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी होती. दादर आणि गोरेगाव हे दोन्ही परिसर कष्टकऱ्यांचे किंवा सामान्य मध्यमवर्गीय लोकांचे परिसर म्हणून ओळखले जातात. ईथल्या हजारो लोकांनी आपली आयुष्य भराची पुंजी ईथे जमा केली होती. ह्या बँकेत खातेप्रमुख म्हणून दैनंदिन रक्कम हाताळणाऱ्या हितेश मेहता याने पुढे जाऊन प्रभादेवी शाखेच्या ११२ कोटी आणि गोरेगाव शाखेच्या तिजोरीतून १० कोटी रुपये गहाळ झाल्याचे आढळून आले. आता यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे यासाठी पोलीस तपास करत आहेत. नेमका कसा झाला हा घोटाळा असा प्रश्न तुम्ह्लाही पडला असेल? तसा तो अनेकांना पडला. याच कारण असा आहे ही बँकच मुळी कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांची होती.
हितेश मेहता २०२० पासून बँकेच्या लॉकरमधून पैसे गहाळ करत होते. तिजोरीत पैसे ठेवण्याऐवजी तेच पैसे तो बँकेच्या बाहेरील व्यवहारात वापरत असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. बँकेचे पैसे आपण नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना दिल्याचे मेहता यांनी पोलिसांसमोर कबूलच केलाय. कोणतीही शंका येऊ नये म्हणून मेहता रजिस्टरमध्ये रोख नोंदी देखील करत होते, पण पैसे तिजोरीत जात नव्हते. पण कोणताही कनिष्ठ कर्मचारी त्याला विचारायचे धाडस करत नव्हता. कारण मेहता एका महत्त्वाच्या पदावर होते.
आणि RBI ने घेतलेल्या तपासानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली कि प्रत्यक्षात बँकेच्या खात्यात जमा झालेली रक्कम आणि बँकेच्या तिजोरीत जमा असलेली रक्कम ह्यात खूप मोठ्या स्वरूपाची तफावत होती.आणि ईथेच घोटाळ्याची नांदी होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकच्या केवळ व्यवहारांवर बंदी घातली आहे. बँकेचा परवाना अजून तरी रद्द करण्यात आलेला नाही. हे सामान्य माणसाच नशीबच समजाव.पण पण ही भीती कधीही खरी होऊ शकते. ५ वर्षात ६० नागरी सहकारी बँक बुडल्या पण न्यू इंडिया कोआपरेटिव्ह बँकच बुडणं अधिक वेदनादायी आहे कारण इथे कष्टकरी जनता,टैक्सी चालक,हमाल,हातगाडी वाले यांनी आपल्या आयुष्यातील पै पै जमवलेली होती त्यामुळेच अश्या बँकेच भविष्य अंधारात जाऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे
बँकेच्या या घोटाळ्यावर अनेक नेत्यांनी आपली बडबडबाजी सुरू केली आहे.आणि जर बोलंदाजीचा विषय आला तर संजय राऊत बोलायलाच हवेत.संजय राऊतांनी सुद्धा ह्यावर भाष्य केले आहे.पण राऊतांचे भाष्य सामान्य नागरिकांना किंवा मध्यमवर्गीयांच्या ठेवीवर लक्ष्य करण्यापेक्षा किरीट सोमय्यांना लक्ष्य करण्यात प्रामुख्याने होत. या बँक घोटाळ्यामुळे सामान्य नागरिकांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे.आता ह्या सगळ्या बुडलेल्या किंवा डुबलेल्या लोकांसाठी कुठले सरकार किंवा कोणते मंत्री धाऊन येणार आहेत?