महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका २० नोव्हेंबरला पार पडल्या तर निवडणुकांचा निकाल शनिवारी २३ नोव्हेंबरला जाहीर झाला. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात दणदणीत विजय मिळवला. तब्बल २३६ जागा महायुतीने जिंकल्या तर केवळ ४९ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला बहुमत मिळालं. तर अपक्ष आणि इतर असे मिळून तिघांनी बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार, या चर्चांना आता उधाण आले आहे. याच प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी राजकीय भविष्य करणारे आणि वेगवेगळ्या ग्रहांच्या स्थितीचे आकलन करून देणारे पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी फेस टू फेस मुलाखत घेतली.
मुलाखतीत पंडित राजकुमार शर्मा यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा कोण होणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, दोन्ही संघाच्या नेत्यांनी संघर्ष केला पण भारतीय जनता पार्टीने १२५ ते १३२ पर्यंत जाते तर एकनाथ शिंदे ५७ वर जातात. दोन्ही नेत्यांनी आणि अजित पवारांनी पावलावर पाऊल ठेऊन जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मतारखेवरून त्यांच्या राशीला साडेसाती चालू आहे. पण देवेंद्र फडणवीस हे कार्यशील, परिश्रम घेणारे आहेत. कर्माचे फळ देणारा शनी त्यांच्या सोबत आहे. शनि नेहमी लोकांना केलेल्या मदतीचा मागोवा ठेवतो. देवेंद्रच्या कुंडलीत केतूची महादशा चालू आहे. पण त्यांना गुरूचेही पाठबळ आहे त्यामुळे कुठेतरी राजकीय वातावरण त्यांच्या बाजूने जात आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा आजही समोर दिसत आहेत. भाजपने महाराष्ट्रात ८० टक्के संघर्ष करून आपला झेंडा इतका मोठा केला आहे की आणखी १५ जागा घेऊ शकले असते तर त्यांना कोणाची गरजच नसती.
बातमी अपडेट होत आहे.
हे ही वाचा:
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांचं काय झालं?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.