दिल्ली विधानसभेत २७ वर्षांनी भाजपाने बहुमत मिळवले आहे. या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे चित्र पाहायला मिळत आहे. वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे भाजपाच्या मुख्यालयात दाखल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भाजपा मुख्यालयात उपस्थित आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आज दिल्लीतील लोकांमध्ये उत्साह आणि समाधान पाहायला मिळत आहे. आता विजयाचा उत्साह तर आहे आणि दिल्लीला ‘आप’दा मधून मुक्त करण्याचे समाधान आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. भाजपचे डबल इंजिन सरकार हे दिल्लीचे विकास करणार आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. दिल्लीच्या विकासासमोरील अडथळा दिल्लीकरांनी दूर केला आहे असे यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राजकारणात खोटे बोलणाऱ्यांना जागा नाही. आज अहंकार, अराजकता आणि ‘आप’दा चा पराभव झाला आहे. एनडीए अर्थात विकास आणि सुशासनाची गॅरंटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर केलेल्या भाषणात मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीला आधुनिक शहर बनवणार आहे. तसेच, यमुना नदीला दिल्लीची ओळख बनवणार आहे. हे काम कितीही कठीण असले तरी संकल्प मजबूत असेल. हे काम पूर्ण करणारच असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.
हे ही वाचा :
Follow Us