spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Raju Patil Exclusive Interview : …ते खासदार असतील त्यांच्या घरी; राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे.

Raju Patil Exclusive Interview :  मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच अनुषंगाने टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांची थेट मुलाखत घेतली आहे. तर राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यात प्रचंड घमासान आहे. त्यांना राजेश मोरे आव्हान द्यायचे प्रयत्न करतायत पण प्रत्यक्षात काय घडतेय हे सर्व मुद्दे Face 2 Face मध्ये मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला हे १८ वर्ष सुरू आहे. आणि या 18 वर्षाच्या जर आपण संपूर्ण वाटचालीचा विचार केला तर, राज ठाकरे यांचा हुकमी एक्का म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधिमंडळामध्ये एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जातं आणि ते आहे राजू पाटील… कल्याण ग्रामीणचे आमदार असलेले राजू पाटील हे आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत हे खर आहे. पण यंदाचा निवडणुकीचा कार्यक्रम हा जर आपण विचार केला तर राजकीय समीक्षकांच्या डोक्यालाही मुंगी आणणार आहे. वर्षांमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यालाही झीनझीण्या देणार आहेत. आणि शिवतीर्थ येथे बसलेल्या राज ठाकरे यांनाही काहीसा त्रासदायक वाटणार आहे. कल्याण ग्रामीण या संपूर्ण परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा हा लोकसभेचा मतदारसंघ त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. पण आता मात्र त्यांचा एक शिलेदार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे फेस टू फेस मध्ये आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी दस्तूर खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि या विभागाचे विद्यमान आमदार राजू पाटील आपल्याबरोबर आहेत राजू पाटील. यावेळी बोलत असताना राजू पाटील म्हणाले आहेत की हा मतदार संघ पाच वर्षांपासून तापलेला आहे जेव्हापासून मी निवडून आलो आहे तेव्हापासून येथील खासदार आणि माझ्या मधील श्रेयवाद किंवा कामांवरून वाद चालू होते एक प्रकारचा राग त्यांच्यामध्ये दिसून येत होता. त्यांचा माझ्यावर राग होता असे दिसून येत होते परंतु त्याला कारणीभूत नेमकं कोण होतं हे समजले नाही निवडणुकीच्या आधीचे पंधरा-वीस दिवस जर पकडले तर त्या कालावधीत अनेक घडामोडी या घडल्या होत्या. मनसेचा एक एकांदी शिलेदार म्हणून राजीव पाटील यांच्याकडे बघितले जाते . मग असं खासदारांनी किंवा उद्धव ठाकरेंनी किंवा मुख्यमंत्र्यांनी मदत करायला हवी अशी काही पद्धत नाही आणि तसा माझा स्वभाव देखील नाही. हा मतदारसंघ जो काही तापला आहे या संपूर्ण गोष्टींचा श्रेय हे खासदार यांना जातं असं यावेळी राजू पाटील म्हणाले आहेत.

प्रश्न – सध्या कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील, सुभाष भोईर आणि तिसरे म्हणजे राजेश मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे परंतु ही तिरंगी लढत असेल की दुरंगी लढत असेल?

उत्तर – कोणतीही लढत ही लढत असते राजकारणात कोणी कोणाला हलक्यात घेऊ नये आणि विजय हा एका मताने झाला काय किंवा लाख मताने झाला काय विजय हा विजय असतो. परंतु इथली राजकीय परिस्थिती आहे इथे पारंपरिक येणारा समोरचा उमेदवार हा शिवसेनेचा आहे 2009 मध्ये माझे भाऊ जेव्हा उभे होते तेव्हा देखील हीच परिस्थिती होती. परंतु यामध्ये सुभाष गोयल हे माजी आमदार होते तर राजेश मोरे हे नगरसेवक होते. आणि या ठिकाणी लढत ही सुभाष भोईर आणि माझ्या मध्ये आहे असं यावेळेस राजू पाटील म्हणाले आहेत. राजेश मोरे यांच्यासोबत इतकी मोठी लढत काही दिसून येत नाही त्यामुळे ही लढत तिरंगी असली तरी मुख्य प्रमाणे ही लढत दुरंगीच आहे असं या वेळेस राजू पाटील म्हणाले आहेत.

प्रश्न – कल्याण ग्रामीण मध्ये भूमिपुत्र त्याचबरोबर वाड्या वस्त्या यांच्या वर राहणारे आगरी कोळी समाज, ग्रामस्थ आहेत आणि दुसऱ्या बाजूला पलावासारख्या परिसरात मोड मोठे टॉवर आहेत. टॉवर संस्कृती विरुद्ध भूमिपुत्र असा संघर्ष तू कोणत्याही भागात सध्या सुरू असताना दिसून येत आहे तर हा संघर्ष संपून विकासामधील जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यामध्ये पाच वर्षात तुम्हाला किती यश मिळाले असे तुम्हाला वाटते.

उत्तर – हो मला यश मिळाले आहे कारण इथे सुदैवाने असा कोणताही वाद नाही इथे विकास झाला डोंबिवली शहरात जाणारा महत्त्वाचा मुख्य रस्ता म्हणजे मानपाडा त्या रस्त्याचा विकास झाला . रवींद्र चव्हाण यांच्या सोबत बोलून मला त्यांनी काही रस्ते अपग्रेड करायला लावले. तेव्हा १४८ कोटी फंड मिळाला अंडी तेव्हा १४ रस्ते अपग्रेड करून घेतले. येथील जे १४ गाव आहे त्यांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश झाला. त्याच पाठपुरावा देखील केला. त्यामुळे अनेक काम झाली आणि काम ही होत आहेत.

प्रश्न – एकाबाजूला राज्यचे मुख्यमंत्री जे इतक्या प्रेमाने वागतात आणि दुसऱ्या बाजूला राजू पाटील किंवा रवींद्र चव्हाण या दोघांबरोबर शाब्दिक, वैचारिक, विकास कामांचा पंगा घेणारे श्रीकांत शिंदे. तुम्ही त्यांची कळ का काढता?

उत्तर – मी नाही कळ काढत तो माणूसच तसा तो. तुम्ही संपूर्ण लोकसभेतील सहा ही विधानसभा बघा तुम्हाला तेच उत्तर येईल. यातील अंबरनाथ उल्हासनगर हे दिघे जण तुम्हाला उत्तर देणार नाही. प्रत्येक गोष्टीचं श्रेय त्यांना स्वतः ला घायचे आहे. जिल्हापरिषदेपासूनच्या महाराष्ट्र सरकार पर्यंतच्या आलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी पाट्या लागल्या आहेत.

प्रश्न – एका बाजूला एकनाथ शिंदे तुम्हाला बोलवून शाबासकी देतात किंवा तुमचं काम मार्गी लागलं असं सांगतात तर दुसरीकडे मात्र तुमची सतत धुसपुस चालली आहे. तर थोड श्रीकांत शिंदे यांच्या कलाने घ्यावे असे तुम्हाला वाटत नाही का?

उत्तर – ते खासदार असतील त्यांच्या घरी… इथे मी देखील काहीतरी आहे मी कलाने घेणारा किंवा वागणारा माणूस नाही माझा तो स्वभाव नाही स्वाभिमान महान ठेवून काम करणे हे माझ्या कधीही मनात येणार नाही प्रेमाने माझी मान देखील कापून तुम्ही घेऊ शकता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक मला बोलले तुझा तर खासदारांशी वाद होता आता तुझं कसं होईल. पण तुझ्या गोष्टीचा प्रत्यय मला आला फडके रोडला तेव्हा दिवाळी पहाट होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी ऑफिसला भेट द्या असं अशी रिक्वेस्ट केली होती परंतु ते चुकून स्टेट चा दुसरा बाजूला उतरले आणि तुझ्या ऑफिसला जायचं असं म्हणाले तेव्हा मी त्यांना हात पकडून ऑफिसला नेला असा कोण सीएम असेल त्याच्या मी हाताला धरून नेऊ शकतो.

प्रश्न – एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या संबंधांचा कल्याण ग्रामीण डोंबिवली या विकासाला हातभार लागला का ?

उत्तर – या विकासाला त्यांच्या पुत्राच्या रूपाने हातभार लागला काही काम मी सुचवली त्या रूपाने देखील हातभार लागला विकास होत आहे आणि त्याचबरोबर या कोणत्याही गोष्टीचा श्रेया मला नको आहे. ज्या गोष्टी मी बोलतोय त्या ते घेऊन येत आहे. अनेक गोष्टी ज्या मी आहे मी सुचवले आहेत परंतु त्याचे सर्व श्रेय ते घेतात परंतु माझी याला काही हरकत नाही मी त्याचा श्रेय त्यांना घेऊन देतो मला याचा काही फरक पडत नाही.मी स्वतः म्हणतो की डोंबिवली दिवा मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्ता करा याची स्वतः मी तुमच्या पद्धतीने पाठीमागे तुम्ही त्याचे श्रेया मला काही हरकत नाही. मी कामांना विरोध करणाऱ्या किंवा श्रेय घेणाऱ्या व्यक्तीचा माणूस नाही. यात वैयक्तिक असं काही नाही. मला असं वाटतं यांना लहानपणी बाळकडू पाजण्याच्या ऐवजी फक्त कडू पाजला आहे की नाही अशी शंका येते. एकनाथ शिंदे यांचा स्वभाव आणि श्रीकांत शिंदे यांचा स्वभाव यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. एकनाथ शिंदे हे माणसं जोडत असतात तर ते माणसं तोडत असतात. परंतु स्वभावाला औषध नसत. तिसऱ्यांदा खासदार झालेत हळू हळू बदल होईल त्यांच्यात असं यावेळी राजू पाटील म्हणाले आहेत.

प्रश्न – लोकसभेला गळ्यात गळे घालून फिरत होते आणि लगेच सर्व माहोल हा खराब करून टाकला.

उत्तर – मी काहीच माहोल हा घरोबा केला नाही.

प्रश्न – पुढची पाच वर्ष जो कोणी आमदार असेल त्यालाही तुमच्या इतकाच अडचणीचा सामना करावा लागेल? नवीन आमदार आला तर त्यालाही अश्यातच समस्या असतील ?

उत्तर – सुभाष भोईर आणि मी आमच्यात लढत दिसते. जर तर वर भाष्य करण्यात अर्थ नाही परंतु सरकार हे महायुतीचे येणार हे दिसतंय.. आम्ही त्या सरकार बरोबर जाणार हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. भाजप आमचा जवळचा पक्ष आणि आमही त्याला समर्थन देणार. अश्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा इथंगे आमदार आला तर त्यांची काम त्यांना करुदेत. मी इतकी मदत करून माझी काम केली नाही. उबाठा च्या आमदारांची काम करतील का ?

प्रश्न – विद्यमान आमदार असलेल्या राजू पाटील यांना विकासाच्या दृष्टीने काय खुणावतंय? आणि मंत्री पदाबद्दल तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? मनसेचा एकांडी झेंडा पकडणाऱ्या राजू पाटील यांना मंत्री व्हायचं?

उत्तर – मला अजिबात मंत्री व्हायचं नाही. ही निवडणूक लाढच्याची पण माझी इच्छा इतकीच कि माझंही काही व्हिजन ठरले आहेत. गेल्या वर्षात कोव्हीड असून मी चांगलं काम केलं. गेल्या वर्षात मी तीन मुख्यमंत्री, तीन राज्यपाल पहिले सगळ्यांमध्ये अजित पवार कॉमन पहिले अश्या गोष्टी राज्यात घडत आहेत. परंतु इथे कल्याण ग्रामीण मधला जो विकास आहे तो करायचा. हा कल्याण ग्रामीण खूप काम करण्यासारखा विभाग आहे. पती तशी कोरी, विस्तृत पसरलेला मतदार संघ आहे. आता १४ गावं नवी मुंबईत गेली तर त्यांचा प्रश्न आता सुटलेला आहे. तो सर्व विकसित परिसर आहे. आमच्या इथे बुलेट ट्रेन, आरोग्य अश्या अनेक समस्या आहेत. आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत परंतु लोकांच्या आरोगयाची नस त्यांना अजून सापडली नाही. तसेच पाण्याचा देखील मुख्य प्रश्न आहे. कल्याण शिळफाटा रास्ता त्याला पर्यायी रस्ते व्हायाला पाहिजे.

प्रश्न – राजू पाटील हा बिल्डरांचा आमदार? त्यांना सोयी सुविधा, पायाभूत प्रकल्प, त्यांचं प्रकल्प विकले जावे म्हणून काम करणारा असं लोक म्हणतात?

उत्तर – पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मि स्वतः एक बिल्डर आहे. त्यामुळे दुसऱ्या बिल्डरांचा मित्र असल्याचं कारण नाही. मित्र कोण असतो ? जो कारण नसताना इथे मेट्रो आणतो काय काम त्याच ? आता आणलं ते काय गरज होती ? हे सर्व प्रकल्प बिल्डरांचे फ्लॅट विकण्यासाठी आणलेले प्रकल्प आहेत. भिवंडी वरून कल्याण पर्यंत कोणच्या प्रकल्प आहे ते तुम्ही बघा मग तुम्हला समजेल तो कोणाचा मित्र आहे. व्यवसायिक अनेक मित्र आहेत परंतु त्यांच्या फायदासाठी इथल्या लोकांचं मी नुकसान करू नाही शकत.

प्रश्न – राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कडून तुमची येणाऱ्या ५ वर्षात काय अपेक्षा आहेत?

उत्तर – राज ठाकरे यांचे व्हिजन म्हणजे त्यांनी स्वतः महाराष्ट्राचा विकास आराखडा हा काढलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी रेल्वेचा एक स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाबतीत राज ठाकरे यांचं स्पष्ट व्हिजन आहे. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हि एक टॅग लाईन राज ठाकरेंची आहे. माध्यम सतत म्हणतं असतात की राज ठाकरे नेहमी भूमिका बदलत असतात. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हिच त्यांची भूमिका आहे. ते त्यांच्या भूमिकेपासून कधी बाजूला झाले नाहीत. तर त्यांच्याकडून आमहाला खूप अपेक्षा आहेत. एकनाथ शिंदे हे सरकार देखील पालिके लेव्हलला चालवत आहेत. त्यामुळे त्यांचा कडून जास्त काही अपेक्षा नाहीत. लाडकी बहीण योजना आणली पण बहीण लाडकी करायची असेल तर त्यांना पाणी द्या. ते हंडा घेऊन रस्त्यावर उभे असतात त्यांची दया येउद्या आणि त्यांना पाणी द्या. मला फक्त राज ठाकरेंकडून अपेक्षा आहेत बाकी कोणाकडून अपेक्षा नाहीत.

प्रश्न – कल्याण ग्रामीण मधील लोंकानी आता पर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. पुढच्या ५ वर्षांत विश्वास ठेवण्यासाठी कोणती ३ काम सांगणार आहेत?

उत्तर – मी त्यांना १०० टक्के खात्री देतो की इथला पाण्याचा आणि ट्राफिकचा प्रश्न हा सुटलेला असेल. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या समाजाची आगरी अस्मितेचा प्रश्न सुटलेला असेल.

Latest Posts

Don't Miss