लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचार सभा थंडावल्यानंतर आता पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सभांचा जोर लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(Raj thackeray) महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मुंबईत ही तिसरी सभा पार पडली. आहे.शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे(Shrikant shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के(Naresh mhaske) यांच्या प्रचारासाठी कळवा येथे “राज ठाकरे”(Raj thackeray)यांची आज सभा पार पडली.त्यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघाती टीका केली.
महायुतीचे ठाणे लाेकसभा मतदारसंघाचे नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. त्यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी “आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. फेविकॉल ची जोड आहे तुटणार नाही”असं म्हणत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.त्यानंतर “ज्या नेत्याने बोट धरुन मला या राजकारणात आणलं. भारतीय विद्यार्थी सेनेची मला जवाबदारी दिली आणि त्याच माणसाच्या उपस्थितीत माझ्या खासदारकीची ही पहिली सभा आहे.” “राज ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला नसता तर राजकारणात नरेश म्हस्के नसता.”असं म्हणत ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यानंतर “आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. फेविकॉल ची जोड आहे तुटणार नाही”असं म्हणत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडीतील काही लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे फक्त शिव्या देत असतात. “गलीच्छ भाषा राजकारणात आणण्याचे काम आघाडीतील नेत्यांनी केले”; “असं म्हणत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचा कळवा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात “राज”गर्जना झाल्याने त्यांच्यासभेचे राजकारणात काय पडसाद उमटणार हे पाहणं तितकचं गरजेचं आहे.
हे ही वाचा:
‘एक अकेला सब पे भारी’ बोलणारे सत्ता जाण्याच्या भीतीने… Sachin Sawant यांचा PM Modi यांना खोचक टोला
पुलवामाच्या हल्ल्याला जबाबदार कोण? Uddhav Thackeray यांचा PM Modi यांना सवाल
Follow Us