संजय राऊत यांना मातोश्री खरंच मारहाण झाली का? बातमी नेमकी कोणी दिली? सध्याची पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ? यासारख्या प्रश्नांवर ज्येष्ठ पत्रकार- संपादक भाऊ तोरसेकर यांनी टाईम महाराष्ट्रशी exclusive बातचीत केलीय.
तुम्हाला ज्येष्ठ पत्रकार म्हणून महाराष्ट्र आणि देश तुम्हाला ओळखतो. आपण ज्या वेळेला बातमीदारी करतो त्यावेळेला दोन्ही बाजूची मतं आणि पक्ष समजून घ्याला लागतो. कारण आपण ज्याच्या विरोधात बातमी करतोय त्यांचेही म्हणणं आले पाहिजे असे संस्कार तुम्ही अनेकांवर केले, अनेक पिढ्यांवर केले. पण आज तुमच्याकडून जो व्हिडीओ झालेला आहे. त्या व्हिडिओमुळे एवढा जो गदारोळ झालाय संजय राऊतांच्या बाबतीतला तो विडिओ आहे. काय नेमकं झालं आणि तुम्ही अश्या पद्धतीत विधान केलाय की संजय राऊतांना मातोश्री मध्ये मारहाण असं हिंदी मीडिया सांगतोय, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होत. आणि तुमचा दुजोरा, तुमचा संधर्भ देत काय हिंदी मीडियाला सांगायचं. असा प्रश्न टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी ज्येष्ठ पत्रकार- संपादक भाऊ तोरसेकर यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी उत्तर दिलाय
उत्तर – गंमत अशी हा व्हिडीओ २९ तारीखील प्रतिवाद नावाचा हिंदी माझं यूट्यूब चॅनेल आहे. त्याच्यावर मी एक विडिओ टाकला होता आणि त्याचा हेडिंग असेल सूत्र कहते है, उबाठा शिवसेना मे मातोश्री पर सीताराम केसरी कांड होगया. हेडिंग मध्ये कुठेही संजय राऊत नाही. मला कळत नाही संजय राऊत का झालं. मी जे काही किरकोळ गोष्टी ऐकलेल्या होत्या कुजबुज ऐकलेली होती महापालिका निवडणुकीच्या जी गटप्रमुख विभाग प्रमुख वगैरे अशी बैठक मातोश्रीवर चालली होती त्यामध्ये काही तरी संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे काही लोक वैतागले आणि काही तरी बाचाबाची झाली आणि मग संजय राऊतला रूम मध्ये नेण्यात आलं हे ऐकलं. हे इतर अनेकांनी दिलेला आहे. मीच दिल असं भाग नाही. पण असं झालं असेल तर इथून माझ्या व्हिडिओला सुरवात होते. माझ्या सगळ्या व्हिडिओचा बेस काय की हे झालं असेल तर ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे २५ वर्षांपूर्वी असंच काँग्रेस पक्षामध्ये सीताराम केसरीच्या बाबतीत झालं होत. आणि मग नेत्यांवर खालचे कार्यकर्ते नाराज होतात तेव्हा ते सगळी परिस्थिती आपल्या हातात घेऊन ते अराजक माजतं तो माझ्या व्हिडीओचा विषय आहे. म्हणजे ८०% मी सीताराम केसरी प्रकरणावर बोललोय. आणि त्याचा संधर्भ इतकाच आहे. कि हे जर प्रत्येक त्या पासून धडा घ्याला पाहिजे होता. शिवसेनेनं जर त्यापासून धडा घेतला नसेल तर त्याचा परिणाम असे होऊ शकतात, पण हे झालं असेल तर हे मी वारंवार सांगितले पण हे ऐकायचं. अनेकदा काय होत हा एक सायकॉलॉजीचा भाग आहे. आपल्याला जे आवडतं ते ऐकायचं किंवा बघायचं आणि मग अनेकदा असं होत की ते घडलं नाही ते बोललं नाही तरी आपल्याला ऐकू येतं आणि मी याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टातलं उदाहरण सांगतो. सुप्रीम कोर्ट मध्ये ज्यावेळेला शिवसेनेची फाटाफुटीची केस चालू होती कपिल सीब्ल शिवसेनेतर्फे बाजू मांडत होते आणि जनरल तुषार मेहता बोलत होते. तुषार मेहतांनी या संदर्भात एक शेर सांगितलं की दुनिया इतनी बढती गई मला तो शेर पूर्ण आठवत नाही, दुरिया इतनी बढती गई की आणखी काय झालं आणि मग ते पुढची ओळख दुसरी ओळ अशी आहे की उसने वो भी सुना जो मैने काही भी नही नेमकं या व्हिडिओच्या बाबतीत तेच घडले, की मी जे बोललोच नाही ते ऐकून त्याच्यावर अनेकांनी हिंदीत व्हिडीओ बनवले. तर त्याचं सायकॉलॉजिकल कारण असं असतं की मला जे ऐकायचे आहे, मला जे बघायचे आहे गेल्या पाच सात वर्षांमध्ये यांनी आपली जी प्रतिमा मीडियातून बनवलेली आहे. त्याचा अनेकांना राग येतो आणि त्यामुळे संजय राऊतला कोणी मारलं असेल तर वा छान छान असं वाटणारा बराच वर्ग आहे. त्याला ह्या सगळ्या यूट्यूबर्सनी कॅटर केलं नाही.
प्रश्न – पण मला सांगा कि हे सगळं होत असताना तूम्हाला मी स्वतः फोन केला होता तसे तुम्हाला देशभरातून अनेकानी फोन केला असेल. तूम्हाला कन्फर्म करण्यासाठी कोणाचा फोन आला नाही,
उत्तर– कोनाचाही आला नाही पण मग हे पत्रकारितेचं काय लक्षण आहे. हे सगळीकडेच झालाय ना आता आपल्याकडे आता पत्रकारीता राहिलेली नाही. मी त्याला आताच्या पत्रकारितेला गुगल विद्यापीठाचे चुगल विध्यार्थी असं म्हणतो. चुकल्या तुम्ही यांना शिव्या घालता का घाला रे, तुला शिव्या घालता, तुला काय म्हणायचं हे काय प्रकरण आहे मला काही कळत नाही. संजय राऊत काही तरी बोलले. हे जाऊन तुम्ही देवेंद्र फडणवीस विचारणार का विचारणार बाबा त्याच्यावर देवेंद्र फडणवीस रिएक्ट व्हायचं की नाही बघा ना किंवा एकनाथ शिंदे रिएक्ट व्हायचं का नाही मग त्याच्या तोंडून काही तरी काढायचं आणि मग तिसऱ्याला जाऊन विचारायचं
प्रश्न – पण मग हे टप्प्यावर पत्रकारिता का आली विशेषतः चॅनेल पत्रकारिता का आली नाही त्याचा कारण काय ?
उत्तर – बजेट, त्याचा कारण बजेट आहे बजेट याचा अर्थ असा असतो की जाऊन स्टोरी करायची तर स्टोरीसाठी खर्च पडतो. तो कॅमेरामन ते सगळं युनिट पाठवा मग तिथली अभ्यास करा तो अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही त्या विषयाचा तो अभ्यास करा ती सगळी मेहनत करा ती मेहनत नको आणि तुम्हाला कमीत कमी खर्चात २४ तास काहीतरी दाखवायचं मग ते चराट चालू होतं तेव्हा तुमच्याकडे बुधला काय होत का काहीच नाही आणि मग त्याच्यावरून मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही लोक शाळेते असतानां तुमच्या शाळेत एडुकेशन डिपार्टमेंटने पाठवलेले पोस्टर लावलेलं. तुम्ही वाचलं असेल. अब्राहाम लिंकन ने आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेले पत्र बघितलं होत की आजही आहे एडुकेशन डिपार्टमेंटने पाठवलेलं पत्र आहे. असं पत्रच लिंकनने लिहिलेले नाही आहे. आणि ही मी आता स्टोरी सांगतो ही पाच वर्ष जुनी आहे. पुण्याच्या एका गृहस्थानी हे सगळं प्रकरण नेमकं कुठलं आहे लिंकनच हे ओरिजिनल निर्देश पत्र का नाही. म्हणून त्याने चौकशी सुरु केली. एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणाले की आम्हाला साधना साप्तहिकाच्या अंकामध्ये ते मिळालं होत आणि उत्तम आदर्शवत आहे म्हणून आम्ही ते छापलो मग साधनेत गेले त्या साधनेत म्हणाले वसंत बापटांनी ते कुठून तरी लिहून दिलं होतं आम्ही छापलो होतो बापटांना विचारलं बापट म्हणाले कुठल्यातरी स्मरणीत मध्ये मला आवडलं आणि म्हणून मी ते भाषांतरित केलो तो माणूस इतका हट्टाला भेटला होता की तो अमेरिकन कॉन्सुलेट मध्ये गेला मला म्हणाला हे पत्र पाहिजे ते म्हणाला आम्हाला माहित नाही. तो म्हणाला तुम्ही मला माहिती काढून दिली पाहिजे मग त्यांनी अमेरिकन हिस्ट्री काँग्रेसला कॉन्टॅक्ट केला शेवटी अमेरिकन संसद जेज आहे तिथल्या लायब्ररीने त्याला लेखीपत्र पाठवलं लिंकनचं असं कुठलंही पत्र नाही लिंकनने असं कुठलही त्याच्या मुलांच्या हेडमास्तरांना पत्र लिहिल्याचं कुठलीही नोंद कुठेही नाही पण आजही म्हणता आहे बरोबर ना बरोबर मग तेच पत्रकारिता आहे.
प्रश्न – नाही पण मग हे असच संजय राऊतांच्या बाबतीत झालाय आता या सगळ्या गोष्टींमध्ये बघा भाऊ मी तुम्हाला अगदी खूप लहान असल्यापासून बघतोय जवळपास ३० एक वर्तमानपत्र ही तुम्ही बदलली असतील. तुमच्या स्वभावामुळे तुमच्या लेखणीमुळे तुमच्या इतर काही गोष्टींमुळे किंवा तुम्हाला काही परवडलं नाही, तुम्हाला विचार पटेल नाही त्यामुळे तशी झाली असेल मला माहित नाही तो आकडा अधिकृत काय आहे २९ झाली म्हणजे तो बरोबर आहे. तुम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलं तुम्ही आचार्य अत्रेंबरोबर काम केलं पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता बदनाम कोण झालं मातोश्री, उद्धव ठाकरे, संजय राऊत की भाऊ तोरसेकर की पत्रकारिता राजधानी दिल्ली सारख्या शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं?
उत्तर – नाही नाही याची दखलच लोक आणली गेली पत्रकारांची दखल याच्या लोकांनी बंद केली. तिथे बसलेले परत आपलं जग इतकं आपण जाऊन म्हणतो ना अख्खा महाराष्ट्र मराठी चॅनेलवर बसलेले लोक म्हणतात अँकर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय अरे कुठला महाराष्ट्र मध्यंतरीच टीआरपीचा अर्णव गोस्वामी प्रकरण झालं तेव्हा मी बरीच माहिती काढली देशामध्ये आपल्या १४० कोटी लोकसंख्या असेल १४० लोक टीव्ही बघत १४० कोटी टीव्ही बघत बघत नाही समजा एक १२० कोटी बघत असेल कुठूनही त्यांच्या घरात येत असेल १२० कोटी मध्ये जे बघतात त्या १२० कोटी टीव्ही बघणाऱ्यामध्ये पावणे दोन टक्के लोक न्युज चॅनेल बघतात सगळ्या भाषेतले पावणे दोन टक्के याचा अर्थ होता देशभरचे फार तर दोन कोटी लोक न्यूज चॅनेल बघतात बाकीचे बघतच नाहीत बरोबर आहे. आता या दोन कोटी मध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी प्रादेशिक सगळे घेतले तर प्रत्येकाची तयारी टीआरपी किती हयकास्ट असेल तो सुद्धा एक कोटी असू शकत नाही अख्खा महाराष्ट्र तुम्ही आणला कुठून आपण तो अमिताभ सिनेमा आहे ना, खडे होते वही लाईन सुरु हो जाते त्यामुळे मी म्हणजेच महाराष्ट्र आपले पुढारी पण तेच बोलतात हे महाराष्ट्रला आवडलेलं नाही. अरे कोणाला आवडलं नाही मला याचा वरचा एक प्रसंग समोर आठवतो. अख्खा भारत बघतोय, अख्खा भारत ऐकतोय अरे कोणाला काय संबंध आहे. पलीकडच्या जगाला माहिती नाही कोण संजय राऊत, कोण भाऊ तोडसेकर,कोण काय माहिती नाही. आपण त्यांना गृहीत धरतो, आणि म्हणून काय होत माहिती आहे का. आम्हाला वाटलं ते अनपेक्षित आहे. अनपेक्षित निकाल अजिबात नव्हते. ज्यांना मत दिली त्यांना माहिती आहे आपण कोणाला काढतोय कोणाला आणतोय. लोकसभेला एक तरी विधानसभेला असं अरे तुम्हाला अक्कल नाही सगळं आम्ही बेअक्कल आहोत. हे कबूल करा हे जे बोलले ना लोकसभेला असं होत मग विधानसभेला बारकडवाडी वगैरे वगैरे बोलतात मला गंमत वाटते, बेअक्कल पणा. अक्कल नाही म्हणून मी बुद्धिजीवी ही परिस्थिती आजची ९९ साली निवडणूका झाल्या. लोकसभा विधानसभा एकत्र झाली. एका वेळेला मी गेलो मतदारसंघामध्ये मी काही ते कागदावर सही केली मी लोकसभेला मत दिल. मी परत आलो मी परत सही केली मी विधानसभेला मतदान केलं. लोकसभेला आणि विधानसभेला महायुती शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला किती मत पडली होती. माहिती आहे. तुम्हाला एकाच युतीला एक मिनिटाच्या फरकाने लोकसभेला विधानसभेपेक्षा ८% मत जास्त आहेत. हे ज्यांना माहिती नाही त्यांना लोकसभेला असतो मी विधानसभेला असतो, म्हणे तुला निवडणूका काळत नाहीत गधड्या आणि तू विश्लेषक म्हणून बसलाय एक्स्पर्ट म्हणून आलेला आहेस आहे की नाही. ८% मतांचा ९९ साली एक मिनिटांचा फरक पडलेला आहे. तो एकाच वेळेला तो मतदार आलाय त्यातला ३२ % हा युतीला मत देतोय दोन्ही वेळेला पाम ८% लोकसभेला युतीला मत देतो आणि आज तोच ८% युतीला लोकसभेला देतो पण विधानसभेला देत नाही. हे ज्याला माहिती आहे त्याला लोकसभेत आणि विधानसभेत का फरक पडला. पण ते ज्यांना कळतच नाही ते सगळे महान विश्लेषक आहेत. कारण ते योगेंद्र यादवांचे आहेत. हे असले योगेंद्र तुमचे जे मंडळी आहेत. त्यांना तुम्ही बुद्धिमान समजून बसले आणि तुम्ही त्यांचे विध्यार्थी झाला तर तुम्ही त्यांच्यापेक्षा निर्बुद्ध होणार कारण बापाचे सगळे गुण पोरांमध्ये येत नाहीत पोराचे सगळे नातवांमध्ये येत नाहीत. आता तुम्ही मुलं आहेत कि नातवंड आहात कि नातवंडे तुम्ही ठरवाल. इतकं सोपं आहे.
प्रश्न – पण मग ही जी फक्त आपल्याला जेवढं हवं तेवढंच घेऊन ठोकाठोकी करण्याची जी पद्धत आहे. हि नेमकी साधारण कधी पासून बघा तुम्ही तर आता गेली चार पाच दशक टीव्ही बघताय बातमी बघताय पत्रकारिता करताय मग ही नेमकी कधी आली आणि ती कधी आवाक्या बाहेर गेली असं तुमचं मत आहे बघा कारण ती वर्तमान पात्रामध्ये सुद्धा तशीच झालेली आहे. कळलं का त्यांनतर ती चॅनेल मध्ये पण तशीच आणि आता डिजिटल मध्ये तर त्याहीपेक्षा
उत्तर – लोकमान्य टिळक फक्त बीए झाले एवढे मोठे होते. आता बीएला प्युन म्हणून पण घ्याल तयार नाही मग ते बीए आणि हे बीए सर्टिफिकेट म्हणून तुम्ही बघणार का, की बुद्धिमत्ता म्हणून. तुम्ही परीक्षा पातळ करत नाही. भाऊ नावाचे पत्रकार म्हणजे महान संपादक लेखक होते. सरकास्टिक माणूस होते फार सुंदर लिहलं होत. एक वाक्य मला आठवतं की राजेंद्र कुमार हि दिलीप कुमारची बारावी झेरॉक्स कॉपी आहे. म्हणजे काय झेरॉक्स काढला त्याच्यावरून झेरॉक्स काढला, त्याच्यावरून अकरावी वरून बारावी वरून बारावीवर अमिताभ बच्चन की गेली कोणाला हे पण कळत नाही. झालाय कुठे सांगतो कि ज्यांना आपण संपादक पदावर बसला म्हणून बुद्धिमान समजायला लागतो. तो बुद्धिमान नाही आहे ना. फरक तुम्हाला सांगतो की अब्दुल कलाम. डॉक्टर अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावर तेव्हा राष्ट्रपती पदाचा सन्मान वाढतो. प्रतिभा पाटील राष्ट्रपती पदावर बसतात तेव्हा प्रतिभा पाटलांचा सन्मान वाढतो. पण राष्ट्रपती पदाचा कमी होतो. आपण हे तारतम्य असत, हे तारतम्य असत उदाहरण तुम्हाला कुठून झालं. आम्ही जेव्हा शालकरी वयात होतो तेव्हा महाराष्ट्र सुरु झाला. महाराष्ट्र संपादक गोविंदकर होते. मग गोविंदकारांबरोबर मनोहर देवधर हे कट्टर सावरकरवादी न्यूज एडिटर, विसू भाऊ देवधर सुनील देवधरचे वडील हे तिथे संपादक मंडळात संघाचे होते. दिनू रणदिवे कट्टर समाजवादी लोहियावादी हि सगळी मंडळी एकत्र नांदत होती. याच कारण तेव्हा पत्रकारिता सेक्युलर दिली. कुमार केतकरांच्या काळामध्ये पत्रकारिया सेक्युलर झाली. १००% तुम्ही कुमार केतकरांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर विचारांचे कोणते दाखवा. पत्रकार हा सेक्युलर असावा लागत कुटून आला माणसाला. आम्ही सेक्युलर नव्हतो काय? आम्ही पत्रकार होतो. आता पत्रकारिता सेक्युलर असते ही डावी विचारसरणी म्हणजे काय असते. तुम्ही माझ्या उजव्या बाजूला उभे राहिले ,मी डावा झालो . तुम्ही माझ्या डाव्या बाजूला उभे राहिले मी उजवा झालो उजवा डावा नसतो मी चांगलं असत ते चांगलं असत. लक्ष्यात घ्या. गंमत अशी आहे की आज मला हे आपल्या बाजूचे ते आपल्या बाजूचे आहेत हे कुठून आलं कधीही दिनू रणदिवेने शिवसेने विषयी खोटं लिहिलं नाही आहे. त्यांचं जे काही राजकीय भूमिका होती लेखातून लिहिली बातम्यांमध्ये नाही. आता बातम्या बातम्या राहिलेल्या नाहीत. बातम्या या त्या भूमिकेतून येतात मला एक सांगा की अख्ख निखिल वागळेंनी आपलं अख्ख आयुष्य उमेदीच हे हे शिवसेना संपावी याच पद्धतीत पत्रकारिता केली. आज ते उद्धव ठाकरेंचं कौतुक करत फिरतात.
प्रश्न – पण मग नाही नाही भाऊ मला एक सांगा जरा वैचारिक भूमिका नसती तर शिवसेना ९० च्या दशकामध्ये आणि त्या नंतरच्या पुढच्या १०-१५ वर्षांमध्ये खूपच जोरकस होती काम करत होती. मग त्या फोर्स मध्ये समोर पण निखिल टिकून होते. त्यांचं वर एकूण ११ वेळा हल्ला झाला.
उत्तर – हे कश्याच बदल आहे म्हणजे हा नेमकं काय आहे. नाही कारण त्यांच्याकडे कुठली वैचारिक भूमिका नाहीये मी तुम्हाला आणखीन एक साधं उदाहरण देतो. मला पण ११ वेळा हल्ला झाला. तेव्हा रक्तबंबाळ झालेला निखिल वागळेंचा फोटो मला आणून दाखवा. हल्ला झाला म्हणजे! मी ५५ वर्ष पत्रकार आहे मी सगळ्यांना सडकून टीका करतो कि नाही. शिवसेना बाजूला ठेवा, भाजप बाजूला ठेवा, मला राष्ट्रवादी वाल्यानी का नाही मारलं, मला काँग्रेस वाल्यानी का नाही मारलं, मला का नाही मारलं. मी पवारांचा अत्यंत पडवा टीकाकर आहे. मला कोणी फोन वर धमकी सुद्धा दिली नाही. इथे फरक पडतो. फरक कुठे असतो. तुम्ही जेव्हा सुपारीबाजी करता मी त्याचा फरक सांगतो. तुमच्या कोणी तुम्हाला इजा करणारा असेल म्हणून तुम्ही त्याला मारत नाही. तो इजा का करतो याच तारतम्य सामान्य माणसाला असत. डॉक्टर तुम्हाला फाडतो शाश्त्रक्रिया करतांना. तो इजा करतोय ना, बट यू COOPERATE, कारण तुम्हाला कळते हा आपल्या भल्यासाठी कापतोय, पण एखादा माणूस तलवार सुद्धा घेऊन आला तुमच्या अंगावर मग तुम्ही त्याला का विरोध करता तोच फरक इथे. कोणाला मारता आणि कोणाला नाही मारतात बघा मग तुम्हाला कळेल की लोक सुपारी बाजीवर हल्ला करतात पत्रकारितेवर नाही. तेव्हा निखिल वागळे हा डेलिब्रेटलीच तिवचत होता हा शिवसेनेला. किंबहुना शिवसेनेने जर त्याच्यावर तसा हल्ला केला नास्ता तर निखिल वागळेला कोणी दाखल घेतली असती. असंच आहे, हीच वस्तुस्थिती आहे. तो दिवसात होता आणि हे कपिल पाटील ने त्याचा पहिला न्यूज लेटर लिहिलेला आहे. की शेर खाली आला, की कळ काढायचा निखिल वागळेचा हे तुम्ही वाचलं की नाही माहिती नाही. मी त्याच्यावर एक त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या विरुद्ध लेख आहेत. त्याच्यावरती माझी लेखमाला आहे. मी त्याच पुस्तक मुद्दाम ठेवणार, तुमच्या पिढीच्या पत्रकारांचं.
प्रश्न – निखिल वागळे आणि कपिल पाटील हे दोघेही खूप चांगले मित्र होते आज दिनांक असेल महानगर असेल.
उत्तर – राष्ट्र सेवादलाचे होते. पत्रकार नंतर झाले. त्यांची विचारधारा ठरलेली आहे आणि विचारधारेसाठी ते पत्रकार झाले. पत्रकारिता हा त्यांचा पेशा नव्हता. हे लक्षातघ्या.
प्रश्न – पण आज आमदार असलेले कपिल पाटील, यांना सगळ्या पक्षांमध्ये मित्र आहेत. त्यांना एक आदराचं एक स्थान आहे. कोणत्याही पक्षाचा नेता दिसला तर त्यांच्या बरोबर बोलतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय. लोकभारती सारखी संघटना त्यांनी उभी केली शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची मग ती सगळी गोष्ट निखिल वागळेंना नाही करता आली, मग जर ते तितके मोठे पत्रकार होते आणि त्यांच्या लेखणीने जर एक शिवसेनेसारखा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता दाखल घेत होता मग हे जे काही घडू शकलं नाही आणि जे घडलं त्याचं मूल्यांकन तुम्ही कसं करताय.
उत्तर – नाही त्यांना माहित होत अगदी कपिल पाटीलने लिहलेला आहे त्याच्या लेखामध्ये कि हिंदी महानगर मध्ये देवर हा शब्द वापरायचा नाही कारण त्याच्यात देवरा आलं तर आपली नौकरी जाईल. कारण देवरा निखिल फायनान्स करत होता कपिलला सूचित करायचं तेव्हा देवरा कोणासाठी शिवसेना वाढायसाठी फायनान्स करतील तुम्ही हे बघू शकता. असं काही मोठं नसत आणि लपत नाही ना. आणि दुसरी गोष्ट काय होते सांगू मी त्याला निखिलने जी पत्रकारिता केली आहे. त्याला मी इंटलेक्चुअल पोर्नोग्राफी म्हणतो. पोर्नोग्राफी कश्यासाठी असते. की अगदी वयात येणारी मुलं असतात ज्यांना त्या शारीरिक आकर्षणाचे वेगळं कुतूहल असंत. पण अनुभव नसतो, त्या कुतूहलापोटी तिकडे आकर्षित होतात. किंवा मग ७० ८० पार केलेले गल्ली धकात्र झालेले असतात ते आंबट चोकी मागतातडाव्या चळवळीतले सगळे लोक सगळी डावी चळवळ शिवसेनेमुळे खच्ची झाली. तर त्यांच्यासाठी निखिल वागळे हा पेपर काढतो. आणि मग त्या लोकांना जे वाचायचं होत आता हे आपला जो विषय आहे संजय राऊतचा नेमकं तेच आहे. त्यांना ते वाचायचं होत, त्यांना ठाकरेला डिवचायचा होता, तो डिवचण्यासाठीं निखिल मार खायला तयार होता. डाव्या चळवळीतले सगळे लोक सगळी डावी चळवळ शिवसेनेमुळे खच्ची झाली. तर त्यांच्यासाठी निखिल वागळे हा पेपर काढतो. आणि मग त्या लोकांना जे वाचायचं होत आता हे आपला जो विषय आहे संजय राऊतचा नेमकं तेच आहे. त्यांना ते वाचायचं होत, त्यांना ठाकरेला डिवचायचा होता, तो डिवचण्यासाठीं निखिल मार खायला तयार होता.
प्रश्न – पण आज आता तुम्ही विडिओ केला त्यातून जो काही ओझरता उल्लेख झाला म्हणा किंवा तुमच्याकडून अनाहूतपणे झाला किंवा तो संदर्भासाठी आला, संजय राऊतांना फटके पडले किंवा संजय राऊतांवर हल्ला झाला. हे दिल्लीतले लोक चवीचवीने का बघतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये तुमचा संधर्भ देत हिंदी पत्रकाराना याच्यातून काय असुरी आनंद मिळवायचा आहे.
उत्तर – असुरी आनंद नाही त्या वर्गाला जस मी सांगितलं निखिल आणि निष्क्रिय निकम्मे झालेल्या डाव्या चळवळींच्या लोकांना ठाकरेंना डिवचून आनंद येत होता म्हणून त्याला इंटलेक्चुअल पोर्नोग्राफी म्हणतो याला. की आपण काही करू शकत नाही आहे. आता तो मला माझा एक मित्र होता सिनेमातला त्याला म्हंटल हे तुम्ही दाखवता असले हिरोईनच्या मागे तो रस्त्यात लोक बडवतील जाम. त्याला तो वही तो काय बघणारा वर्ग आहे. कसं काय, हेमा मालिनीने आपल्या आयुष्यात येत नाही तर तिला छेडणारा धर्मेद्र लोकांना आवडतो. तो त्याला छेडायचं असतो. तो कोणी जरी छेडलं तर आवडत तस हे जे असतना हे एक प्रकारचा विकृत आनंद असतो आणि त्यामुळे बाळासाहेब हिंदुत्ववादी होते. मग उद्धवने सगळं वाटोळं केलं ते संजयमुळे झालं असं वाटणारा जो वर्ग आहे. असा वर्ग मोठा आहे, देशभर आहे, मी सांगतो मी अयोध्येत प्राणप्रतिष्टेला गेलो होतो. तिथे मला केमिस्ट कडे जायची वेळ आली त्या केमिस्ट कडे गेलो. तर त्यांनी ओळखलं हा इथला नेतृत्व माणसाचा म्हणजे मार्मिक लगेच बसायला गेलो. बाळासाहेब तो क्या वाह बैठकर या मजीद गिराये वगैरे वगैरे. त्याला म्हणे भयंकर बाळासाहेबांविषयी आदर होता. त्याला म्हंटल आप कभी मुंबई गाये नाही म्हणतो, यही तो है मग, त्याला कसला आदर होता. तर त्याला जे बाळासाहेबांच्या इमेज विषयी आकर्षण होत. तिथून शिवसेना डेफिनेट जरी झाली. याचा राग यायचा. मग ती डेफिनेट कोणामुळे झाली तर संजय राऊतच्या प्रॉब्लेममुळे झाली. तर मग संजयराऊतला मारलेलं त्याला आवडेल. हा असा वर्ग असतो. असा वर्ग आहे का तुम्ही विचारता. मला सांगा कि इथे मुंबऱ्यातल्या किंवा सहराणपुरच्या जो मुस्लिम आहे त्याचा गाजापट्टीशी काय संबंध आहे. गाजापट्टी तो अजमल कसा आला तो त्या कुठे पुलाव्यातला जूनच्या केंद्रावर हल्ला करायला त्याचा काय संबंध. हा जो एक सायकॉलॉजिकल भाग असतो. त्यातून या गोष्टी येतात आणि मग हे लोक त्याला तसं निखिल ने त्या काळात जे पत्रकारिता केली तो हे जे आपण डाव्या चळवळीत फसलेल्या होत्या रुतलेल्या होत्या त्यांना त्याचा विकृत आनंद मिळत होता. आणि म्हणून त्याचा मागून उभे राहिलेले सगळेच्या सगळे बरोबर आहे. म्हणून ह्या लोकांना स्वातंत्र्याचे एवढं कौतुक होतं तर अटकेच्या वेळेला हे सगळे गप्प का होते ते पत्रकार नाहीत ते ऍक्टिविस्ट होते.
प्रश्न – ही जी रेष आहे पत्रकार आणि ऍक्टिविस्ट हि खूप पुसट आहे असं वाटतं.
उत्तर – नाही पत्रकार पेशा आहे ना मी पत्रकारांच्या मारण्याचं नेहमी समर्थन केलेला माणूस पेशा आहे. चला किराणा दुकानाला कंडक्टरला ड्रायव्हरला डॉक्टरला लोक मारतात, पत्रकाराला का नाही ममारायचं, तुमच्यावर राग आला, तर लोक मारणार तुम्हाला पत्रकार स्वातंत्र्याचा तुम्ही कोणाला आणि आविष्कार स्वातंत्र्य आम्हाला अरे घटनेने तुम्हाला कुठलाही अधिकार दिलेला नाही. तो सगळ्यांना आहे, अविष्कार स्वातंत्र्य आहे ना हे नागरिकाला मिळालेलं आहे. आपण ते वापरतो. आणि तो आपला एक्सक्लुसिव्ह आहे. असं म्हणतात या भ्रमातून पहिले बाहेर पडा आणि आता तेच झालं. आज डिजिटल मीडिया, सोशल मीडिया किंवा यूट्यूब, फेसबुक हे सगळे झाले, सगळे लोक पत्रकार झालेत ना, सोशल मीडिया इज राईट टू एक्सप्रेस. आज सोशल मीडिया मध्ये ज्या काही खोट्या नाट्य बातम्या येतात इतर पेपर मध्ये खोट्या नाट्या बातम्या येत नाही का. रोज आपण खोट्या बातम्या ऐकतो. मी एक उदाहरण तुम्हाला देतो, सुप्रिया ताईंनी काल पर्वा सांगितलं की बीडचे पोलीस सुस्पेंड केला मी त्याच्या बाजूने आहे, मला तो गुन्हेगार वाटत नाही. हे सगळं देतो. एक समोर बसलेला पत्रकार सुप्रिया ताईंना विचारात नाही की सचिन वाझेंनी मनसुख हिरेंची मर्डर केली ती ऑर्डर पण वरील अनिल देशमुखांकडून आली होती का. असं ज्याला विचारता येत नाही तो पत्रकार नसतो.
प्रश्न –राजकीय नेत्यांची पण इतकी दादागिरी पत्रकार परिषदमध्ये आपण बघायला बघतो म्हणजे आधी नेते ऍरोगंट झालेत की पत्रकार बोटचेपे झालेत असा प्रश्न पद्मा इतपत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही राज ठाकरेंची पत्रकार परिषद बघा आता राज ठाकरे यांच्याच वाटेवर चालणाऱ्या प्राजक्ता माळीची कालची प्रेस कॉन्फरेन्स बघा तुम्हाला आता एकदा विचारायला दिला आता दुसऱ्यांना अरे पण दुसरे विचारात नसतील आणि एकाद्या पत्रकाराला जर ते प्रश्न सुचत असतील तर ते विचारायचं नाही का. म्हणजे बिघडलय कोण, नेते बिघडलेत, की पत्रकार बिघडलेत.
उत्तर – नाही पत्रकार बिघडलेत असं मी म्हणेल कारण तुम्ही बातम्या पेक्षा लोक काय बोलतात बाजार गप्पा तुम्ही पत्रकारिता करून, रोज पत्रकार परिषद होतात. आम्हाला आठवत पण माझ्या आयुष्यात मी ७१ च्या निवडणूका होत्या आणि नवल टाटा निवडणुकीला उभे होते आता जे स्ट्रगलिंग टॉकींज आहे तिथे बांधकाम चालू होतं त्याच्या दोन मजल्यावर नवल टाटांनी केलं होत कार्यालय केलं होत. तर मी गेलो होतो मी नवीन नवीन अगदी एक दीड वर्ष झाले. आणि २०० पत्रकार त्यावेळेला मराठीत सहा पेपर होते. हिंदीमध्ये तीन पेपर होते. इंग्लिश मध्ये तीन पेपर होते आणि काही चार- पाच रिव्हर मध्ये पण २०० पत्रकार कुठून आले तिथे खाण्यापिण्याची रेलचेल आमुक तमुक होत. त्याच्यानंतर समोर ब्रिटिश स्टेशनच्या हमाल युनियनची प्रेस कॉन्फरेन्स होती. तीन माणसं समोर मी नवाब नाना मोने आणि पिटी मग हे २०० पत्रकार तिथे का होते ते पत्रकारच नव्हते त्यांना बातमीशी कर्तव्य नव्हतं आज तो पत्रकार दोन दोन तालुका नाही गाव गावात पत्रकार संघ झालेत. कुठे काय छापतात कोणाला काय माहिती असं काय आपण पत्रकारिता पातळ केली की लोक तुम्हाला किंमत देईल. हे सगळीकळे आलं आहे. काय झालं ७७ नंतर हळूहळू जे त्या सगळ्या आंदोलनातून चळवळीतून फ्रस्ट्रेटे झालेले पत्रकार उठले की आपण ऍक्टिव्हिझम करू शकत नसून तर पत्रकारितेतून मला मी कुठेतरी वाचलेलं आठवत,ज्यावेळेला पेशवाई बुडाली आणि महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता आली त्यावेळेला पहिला गव्हर्नर होता तर ते नवीन वर्तमानपत्र भारतात सुरु करायचे असं हे होतं तर ते गव्हर्नर जनरलला पत्र पाठवलं होतं की हेड गेट ओपन करण्यापूर्वी विचार करा, दहा वेळा विचारलं पत्रकार बेसिकली पॉलिटीशियन असं त्याचं कळलं तुम्हाला. पत्रकार आणि पॉलिटिशियन यातला फरक तुम्हाला कळेल, म्हणून मी पत्रकार संघातून एकदा हा प्रश्न विचारला होता की ज्या वेळेला पाहिलं मराठीतलं वर्तमानपत्र आचार्य जांभेकरांनी सुरु केलं बाळशास्त्री जांभेकर त्याची किंमत किती होती लोकांना माहिती आहे, कोणाला उत्तर देता आलं नाही म्हणजे, जस्ट पेशवाई बुडाली होती कंपनी सरकार आलं होत आणि नव्या नव्याने भारतीय माणसं कंपनी सरकार मध्ये नोकऱ्या करत होते दोन तीन रुपयांपासून दहा रुपया पर्यंत जास्तीत जास्त पगार होता. अश्या वेळेला एक रुपया किमतीचा एक माणूस वर्तमानपत्र वेडा होता का नव्हता वेडा, कारण त्याला माहिती होत मी बहुमूल्य ठेव तयार करतो, त्याची किंमत पण.
प्रश्न – पण मग हि आता हिंदी भाषिकांनी केली आहे आता बघा तुमचा विडिओ
उत्तर – पण आज आता तुम्ही विडिओ केला त्यातून जो काही ओझरता उल्लेख झाला म्हणा किंवा तुमच्याकडून अनाहूतपणे झाला किंवा तो संदर्भासाठी आला, संजय राऊतांना फटके पडले किंवा संजय राऊतांवर हल्ला झाला. हे दिल्लीतले लोक चवीचवीने का बघतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये तुमचा संधर्भ देत हिंदी पत्रकाराना याच्यातून काय असुरी आनंद मिळवायचा आहे. असुरी आनंद नाही त्या वर्गाला जस मी सांगितलं निखिल आणि निष्क्रिय निकम्मे झालेल्या डाव्या चळवळींच्या लोकांना ठाकरेंना डिवचून आनंद येत होता म्हणून त्याला इंटलेक्चुअल पोर्नोग्राफी म्हणतो याला. की आपण काही करू शकत नाही आहे. आता तो मला माझा एक मित्र होता सिनेमातला त्याला म्हंटल हे तुम्ही दाखवता असले हिरोईनच्या मागे तो रस्त्यात लोक बडवतील जाम. त्याला तो वही तो काय बघणारा वर्ग आहे. कसं काय, हेमा मालिनीने आपल्या आयुष्यात येत नाही तर तिला छेडणारा धर्मेद्र लोकांना आवडतो. तो त्याला छेडायचं असतो. तो कोणी जरी छेडलं तर आवडत तस हे जे असतना हे एक प्रकारचा विकृत आनंद असतो आणि त्यामुळे बाळासाहेब हिंदुत्ववादी होते. मग उद्धवने सगळं वाटोळं केलं ते संजयमुळे झालं असं वाटणारा जो वर्ग आहे. असा वर्ग मोठा आहे, देशभर आहे, मी सांगतो मी अयोध्येत प्राणप्रतिष्टेला गेलो होतो. तिथे मला केमिस्ट कडे जायची वेळ आली त्या केमिस्ट कडे गेलो. तर त्यांनी ओळखलं हा इथला नेतृत्व माणसाचा म्हणजे मार्मिक लगेच बसायला गेलो. बाळासाहेब तो क्या वाह बैठकर या मजीद गिराये वगैरे वगैरे. त्याला म्हणे भयंकर बाळासाहेबांविषयी आदर होता. त्याला म्हंटल आप कभी
प्रश्न – मग मला सांगा हे सगळं असं होत असल्यामुळे आपण आता या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून पत्रकार परिषद घेतलेली नाही. शेवटची पत्रकार ही पंतप्रधान म्हणून dr मनमोहन सिंग यांनी घेतली होती. आणि २०१४ नव्हे तर २०१२ पासून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सामना सोडून संजय राऊत सोडून कोणाला मुलाखत दिलेली नाही. म्हणजे मग मोदी आणि ठाकरे हे बरोबर आहेत कि ते कोणाला मुलखात देत नाहीयेत इतक्या दर्जाचे किंवा पत्रकार परिषदा बोलवत नाहीयेत. ठाकरे बोलावतात पण मोदी बोलवत नाहीत मग या विरोधाभासाकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय.
उत्तर – मला सिनेमा काढायचा होता. अमिताभ बच्चन मला काम करायला येत नाही काय करू. मी काय उत्तर देऊ अमिताभ बच्चन सोडणं दहा नट पडले आहेत. मला अमिताभ बच्चन का पाहिजे. त्याच्या नावावर माझा सिनेमा चालेल. बरोबर आहे, तुम्हाला मोदींची मुलाखत का पाहिजे याच उत्तर आहे आणि त्याला जेव्हा त्याची किंमत कळली, तेव्हा त्यांनी तुम्हाला मुलाखती द्यायचा होता. जेव्हा मुलाखत देत होता तेव्हा तुम्ही मुलाखती घेत होता. त्याला इंटरव्यू म्हणत नाही त्याला प्रेस कॉन्फरन्स म्हणत नाही बरोबर आहे कि नाही तुम्हाला जेव्हा भाऊचा इंटरव्यू घ्यायचा राजेश कोचरेकर अपमान करायला मी कोऑर्डिनेट करेल तुमच्याशी, नाही करणार. तुम्हाला त्यांनी जर १० वेळा तो सांगतोय कि दंगली बद्दल मी आता पर्यंत शंबर इंटरव्यू दिले. तुम्ही तेच प्रश्न परत विचारणार काय कसा सांगा, कशाला मुलाखत मला नाही द्याची मुलाखत. तिथे तुम्ही संपलात तुम्ही तुमच्यातलं नावीन्य संपवलं. तुम्ही तुमच्या विषयातलं नावीन्य संपवलं. आणि दुसरी गोष्ट पत्रकारांना मुलाखती सोनिया गांधींनी किती मुलाखती दिल्या. २५ वर्ष काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. किती मुलाखती दिल्या. दादागिरी राज ठाकरे करतो. राहुल गांधी पण तोंडावर राजदीपला बोलला तुम्ही भाजपचा एजंट आहे. तेव्हा कोणाची तक्रार नाही मग राज ठाकरे बद्दल तक्रार का असते इथे कळतंय. तुम्ही बांधलेले आहात तुम्ही पत्रकार नाही आहात. यू आर पार्ट ऑफ इकोसिस्टिम हा जो प्रकार झाला. पत्रकार सौदेबाजी करत होते कोणाची मंत्रिपद कोणाला द्यायची कधी बहिष्कृत केलं तुम्ही. पत्रकारांनी कधी याना बहिष्कृत केलं की तुम्ही आमचा धंदा बदनाम करताय. राहुल गांधी असं काही तिथे दाखवलं. पुस्तक तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होत नाही का हे पुस्तक आहे असं असं दाखवायचं पुस्तक आहे. तिथे तुम्ही त्या प्रतिष्ठेला मातीत मिळवत असतात आणि ही गंमत अशी आहे हे तळागाळातला माणूस विचार करतो बुद्धीमंत नाही करत. मी बुद्धीमंत आहे, मी असलेल्या गोष्टींचा विचार करतो पण त्या बुद्धिमंतांच्या मतावर सरकार निवडली जात नाही पण तो एक असतो ९९ लोकं मतं निवडतात.
प्रश्न – मला विचारायचा आहे कोविड मध्ये तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनेल सुरु केलं, तुम्ही आज असं सांगतायत की अनेकांनी काही विशिष्ट पंथ पक्ष निवडले आणि ते त्यांची भट्टी जमवत आहेत. पण डिजिटल मीडियाकडे तुम्ही वळलात त्यावेळेला साधारण ७५ तुमची पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर एक वेगळा अध्याय लिहिलात पण तुम्ही भाजपच्या वळचणीला जाऊन बसलात असं तुमचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटतं. मी अख्या महाराष्ट्राला म्हणत नाही किंवा देशाला म्हणत नाही,अनेकांनी वाटतं. तर हे आम्ही ज्या अत्यंत स्वाभिमानी आणि ताट करण्याच्या भाऊ तोरसेकरांना पाहिलंय. तर ते सुद्धा हिंदुत्वाच्या एका प्रवाहामध्ये किंवा भाजप प्रणित प्रवाहामध्ये वाहत गेले असं समजायचं का.
उत्तर – बाकीचा सगळा मीडिया ज्या वेळेला जिहाजी प्रवाहात वाहून गेला. जेव्हा मुख्य प्रवाहाला वाचवण्याची जबाबदारी मी माझ्याकडे मग तुमच्या लक्षात येईल कि मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध बोलणारा मी धाडसी आहे. बाकीचे गांडू आहेत बरोबर. कसली खंत आहे मी हिंदू आहे. मला हिंदू असण्याची लाज नाही वाटत. यांच्यात कसली खंत आहे. तुम्ही कोणाकोणाचे समर्थन करताय. तुम्ही खाली त्याचा समर्थन करणार. भारत तेरे तुकडे हो ते स्वातंत्र्य आहे. आणि बटेंगे तो कटेंगे लगेच झालं. मी पत्रकार आहे बाकीचे पत्रकारच नाही आहे. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. मला सोलापूरला असाच गेल्या पाच वर्षांपूर्वी गेलो होतोआणि तिथल्या पत्रकार संघाने मी अडकलो होतो काही कारणामुळे तुम्ही वार्ताला आले मग ती मुलं हाच प्रश्न मला विचारला की तुम्ही एवढे ज्येष्ठ असून प्रतिगामी कस लिहिता. तेव्हा यूट्यूब नव्हतं. मी त्यांना म्हंटल तुम्ही लहान आहात पण मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे. मला पुरोगामी आणि प्रतिगामी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि आणि तुम्ही मला सांगा पुरोगामी काय आणि प्रतिगामी काय १९७२ डिसेंबर मध्ये मुंबईला नागपोडा महाराष्ट्र कॉलेज आहे. त्या महाराष्ट्र कॉलेज मध्ये. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती. त्या परिषदेवर अमित दरवाईने ट्रिपल तलाकच्या विरुद्ध मोर्चा काढला. मी त्या मोर्च्यात होतो जग्गन्नाथ कोठेकर, कमलाकर सुभेदार हे माझे मित्र होते हुसेन होते भालचंद्र मुंडगेकर होते. मग तेव्हा मी पुरोगामी होतो की प्रतिकार म्हंटल आज मी ट्रिपलच्या विरुद्व आहे. हुसेन आणि भालचंद्र मुंडगेकर ट्रिपल समर्थन करतात. मी म्हंटल पुरोगामी कोण आहे. ते तेव्हाही पुरोगामी होते. आजही पुरोगामी आहे. की मी तेव्हाही पुरोगामी होतो आज प्रतिगामी आहे तुम्ही ठरवा. आम्हाला यातलं काही माहित नाही म्हणून तुम्ही बुद्धिमान आहात पण तुम्हाला कशातलाच काही नाही जे तुम्हला कशातलाच काही जे माझ्यावर हा आरोप करतात. त्यांनी जावं माझा ब्लॉग आहे २०१४ पासून २०१४ला शिवसेना भाजप युती मोडली तेव्हापासून दीड वर्ष मी भाजपाला उभाड जोडले ते ज्यांनी वाचलं नाही ते म्हणणार मी भाजपवाला आहे. त्याच्या खालच्या कॉमेंट वाचा. हा तास शिवसैनिक आहे ह्या त्याच्या खालच्या कॉमेंट आहे. पण सांगितलं काय तुम्ही वाचलं काय ऐकलं काही नाही आणि मला सगळं ज्ञान आहे. सगळ्या राहुल गांधींची पत्रकारांमध्ये इतकी संख्या वाढली आहे. त्यांनाच काँग्रेसच्या सगळ्यांना अध्यक्ष करावे ज्याला काशातलं काही काळत नाही. तो सगळ्यात मोठा विद्वान आहे. २०१९च्या निवडणुकीपूर्वी कुमार केतकरांनी मुलाखत दिली आहे. मोदी फार घाबरलेला आहे. तो निवडणूका घेणार आणि घेतल्या तरी तो तरी प्रभूच रामचंद्र स्वर्गातून आल्यानंतर त्याला वाचवू शकणार नाही. १९ च्या निवडणुका झाल्या २४ च्या निवडणूक झाल्या एका पत्रकाराने कुमार केतकारला प्रश्न विचारला का या पुढच्या निवडणूका कश्या झाल्या. कुठल्या कानात झाला, कश्या झाल्या,मोदी बदलला का, हा विचारतात कुमार केतकाराला प्रश्न मग. मग तो प्रश्न त्यांना विचारण्यात येत नाही त्या व्यक्तीने भाऊ तोरसेकरला विचारायचं नाही.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?