spot_img
spot_img

Latest Posts

तुमच्या घरातील गौरी ला चापूनचोपून साडी नेसवायची? तर या टिप्स नक्की बघा

भाद्रपद महिन्याची चाहूल लागताच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होते. यंदा १९ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गौरीचे ही आगमन होते.

भाद्रपद महिन्याची चाहूल लागताच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होते. यंदा १९ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गौरीचे ही आगमन होते. ज्येष्ठ गौरी पूजन हे महाराष्टातील विविध घरामध्ये साजरी केली जाते. गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा ही विविध ठिकाणी वेगवेगळी आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य ही दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी असे ही म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी असे म्हणतात.

ज्येष्ठ गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप असे मानले जाते. त्यामुळे ज्येष्ठ गौरीच्या दिवसात माता पार्वती साक्षात माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशीणीच्या आवडीचे गोड पदार्थ बनवले जातात. माहेरवाशीण म्हणून आलेल्या या गौरीचे जास्तीत जास्त देखण्या आणि सुरेख कशा दिसतील, यासाठी महिलांची खूप गडबड सुरू असते. गौरी-गणपती आल्यावर आपण सजावट, प्रसाद आणि पूजा या सर्वांची तयारी करतो. पण महिलांचे प्रश्न तर त्याहून वेगळे असतात. गौरी या उभ्या असतील तर, त्या कमी जागेत त्या बसवायच्या. त्या सोबत साडीचा पोत कोणताही असला तरी ही गौरीना छान चापून चोपून साडी नेसवायची हे एक प्रकारचे आव्हान असते. माहेरवाशीण म्हणून आलेल्या या गौरी जास्तीत जास्त देखण्या आणि सुंदर कशा दिसतील यादृष्टीने महिलांचा खूप प्रयत्न असतो. यासाठी साडी नेसवण्याच्या काही सोप्या टिप्स आपण जाणुन घेऊया.

सर्वप्रथम सुरुवातीला पदराच्या मिऱ्या घालून त्या सेट करुन ठेवाव्या. या सेट केलेल्या पदराला एखादी साईड पीन लावून ठेवल्यास तो पदर अजिबात हलणार नाही. त्यामुळे सर्वात शेवटी तो नीट बसवता येईल. त्यानंतर गौरीच्या साडयामधील मिऱ्या हा साडीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण मिऱ्याचा भाग हा पुढे येत असल्याने तो छान आणि आकर्षक बसणे हे गरजेचे असते. नंतर गौरीच्या स्टॅड हा उंचीप्रमाणे लावायचा असल्याने त्याचप्रमाणे मिऱ्या घालून घ्यावा. संपूर्ण साडीच्या मिऱ्या घालून पहिल्या तीन मिऱ्या या सोडायच्या आणि त्या स्टँडला गोलाकार गुंडाळून घ्यायच्या.उरलेल्या मिऱ्या स्टँडमध्ये आत खोचून त्या सेट करुन घ्या. हे एकदा नीट झाले की नंतर जास्त वेळ लागत नाही. साडी नेसताना आपण ज्याप्रमाणे पीन लावतो त्याचप्रमाणे वरच्या काठाजवळ आणि मध्यभागी तो पीन लावून घ्या. त्यामुळे या मिऱ्या व्यवस्थित राहतात. पुढच्या बाजूच्या मिऱ्या स्टेटनरने व्यवस्थित सेट करुन घ्या. नंतर गौरीच्या शरीराचे छड आणि हात लावावे. यानंतर आपण बाजूला ठेवलेला पदर गौरीच्या उजव्या हाताखालून घेऊन डाव्या खांद्यावर आपण ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे घ्यावा.

सुरुवातीला आपण पदर सेट करुन ठेवल्यामुळे तो नंतर लावायला खूप वेळ लागत नाही. पदर सेट करुन झाल्यावर गौरीचा मुखवटा व्यवस्थित कापूस लावून छडाला लावून घ्यावा. त्यानंतर आपल्या आवडीनुसार गौरीला दागिने घालावेत. त्यानंतर पदर डोक्यावरुन घ्यायला आवडत असेल तर डोक्यावरुन घेऊन दुसऱ्या खांद्यावरुन घेऊन उजव्या हातापाशी तो ठेवावा. पदर देतांना गौराईचे मुखवटे हालणार नाही याची नीट काळजी घ्यावी.

हे ही वाचा:

Modak Recipe, साखर आणि गुळ न वापरता सोप्या पद्धतीने बनवा नाचणीचे उकडी मोदक

Ganeshotsav 2023, गॅस ही न पेटवता करा झटपट इंस्टंस्ट Kaju Katali Modak

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss