spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

जन्माष्टमीला दाखवा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट नैवैद्य

श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भाविक आपल्या लाडक्या श्री कृष्णासाठी पूजा आणि उपवास करतात.

श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भाविक आपल्या लाडक्या श्री कृष्णासाठी पूजा आणि उपवास करतात. यंदा ०६ सप्टेंबर रोजी श्री कृष्णा जन्माष्टमी साजरी होणार आहे. या दिवशी श्री कृष्णासाठी ५६ भोगाचा नैवद्य दाखवतात. तर काही भाविक आपल्या लाडक्या श्री कृष्णा साठी मिठाईचा नैवद्य दाखवतात. जाणून घेऊया अजून काही नैवैद्याचे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट टिप्स…

पंचामृत – पंचामृत हे फक्त प्रसाद म्हणूनच नाहीतर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. हे केसांसाठी फारच पोषक आहे. यामुळे आपल्याला सप्त धातूचं पोषण मिळतं. ज्यामुळे केस होतात निरोगी आणि चमकदार. तसंच वेगाने वाढतातही. आपण मुख्यतः पूजेच्या वेळी करतो. पण पंचामृताचं सेवन सातत्याने केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते. गर्भावस्थेदरम्यान याचं सेवन केल्यास मुलाच्या मस्तिष्क विकासास चालना मिळते.तुमच्या त्वचेसाठी एखाद्या क्लिंजरप्रमाणे काम करते. पंचामृताच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन प्रॉब्लेम कमी होतो. त्यामुळे त्वचेवर आपोआपच ग्लो येतो.शरीरातील पित्ताला संतुलित ठेवतं. त्यामुळे याच्या सेवनाने हायपर एसिडीटी आणि पित्ताचं असंतुलन टाळण्यात मद्दत होते.

सुक्या मेव्याचे लाडू (Dry Fruits ladoo) – सुक्या मेव्या लाडू मध्ये सूक्ष्म पोषक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. सुक्या मेव्याचे लाडू बद्दल बोलायचे झाले तर त्यात ताज्या फळांइतकेच पोषक असतात. वजनाच्या आधारावर, १०० ग्रॅम सुक्या फळांमध्ये १०० ग्रॅम ताज्या फळांपेक्षा ३.५ पट अधिक फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. त्यामुळे कमी सुक्या मेव्यातही तुम्हाला जास्त पोषक द्रव्ये मिळतील.आपण ते ड्राय फ्रूट्स टाळले पाहिजे ज्यामध्ये साखर वेगळी टाकली जाते.

दुधी हलवा ( Lauki halwa) – दुधी हल्वाच्या सेवनाने आपल्याला शरीरात शक्ति येते. यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, आयरन व सोडियम असते .ते आपल्या रक्तातील हीमोग्लोबिनची कमी पूर्ण करते. तसेच आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात राहते. हा हलवा सेवन केल्याने हार्ट संबंधित तक्रारी कमी होतात. त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल जे आपल्याला हानिकारक आहे ते कमी होण्यास मदत होते.दुधीमध्ये कैल्शियम, मैग्नीशियम व जिंक हे गुण आहेत. जे हाडांना मजबूत ठेवते.ह्याच्या सेवनाने स्किन प्रॉब्लेम दूर होतात.

गुळाची खीर – गुळामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वं असतात. जसं व्हिटॅमिन बी१, बी६, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आर्यन, साखर, कार्बोहायड्रेट, सोडियम इ. हे सर्व पोषकतत्त्वं शरीराला कोणत्या ना कोणत्या रूपात लाभकारी असतात. गुळात आयर्न असतं, जे शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.गूळामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हा रोगप्रतिकारक क्षमतेला बूस्ट करतो. खाल्ल्यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. कारण यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात जे अँटिटॉक्सिक परिणाम करतात.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मद्दत करते.

खजुराची बासुंदी – खजुराची बासुंदी खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. १०० ग्रॅम खजूर खाऊन २७७ कॅलरीज मिळतात. बासुंदीने शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो. हे खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही.पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन आटोक्यात ठेवण्यास हे मद्दत करते.

 

हे ही वाचा: 

Janmashtami 2023, यंदाच्या जन्माअष्टमीनिम्मित जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्व

कृष्णजन्माष्टमीला करा या पाच गोष्टींचा वापर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss