धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा केली जाते. अशी एक मान्यता आहे की, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवताला प्रसन्न केल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही. हिंदू धर्मात दिवाळीला आणि धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे.धनत्रयोदशीचा सण, दिवाळी सणाच्या आधी येतो. यादिवशी माता लक्ष्मीची उपासना केली जाते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे धनतेरस च्या या दिवशी उपाय केल्यास तुम्हाला धन-संपत्ती नक्कीच मिळते. तसेच तुमच्या घरातून गरिबी देखील दूर होते.या दिवशी व्यापारी लोक त्यांच्या वार्षिक हिशोबाच्या नव्या वह्यांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मी देवीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.
आजच्या दिवशी सोन्याची व सोन्याच्या अलंकारांची आणि नवीन कपड्यांची खरेदी करणे शुभ समजली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी आणखी लाभ कसा मिळवायचा ते पाहुयात.
माता लक्ष्मीला लवंग अर्पण करा
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीला लग्न झालेल्या जोडप्याने लवंग अर्पण कराव्यात. देवी लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहे, लवंगसोबत वेलची आणि सुपारीही दान करतात, एवढेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीला पानही अर्पण करू शकता.
नाण्यांची पूजा
दिवाळीत खरेदी केलेली सोन्याची किंवा चांदीची नाणी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये पूजली जातात. अशी मान्यता आहे की असे केल्याने व्यवसायात यश प्राप्त होते, तुमच्याकडे सोने चांदी नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवीच्या फोटोजवळ पैसे ठेऊन त्याची मनोभावे पूजा करावी.
कुबेर देवतेची पूजा
धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेरजी यांचीही पूजा करावी. कुबेरजींची पूजा करण्यासाठी कुबेर यंत्र खरेदी करावा आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा करावी.
घरातील फुटलेली भांडी दान करा
आपल्या घरातील स्वयंपाकघरात असलेली जुनी तुटलेली, गंजलेली भांडी वापरणे बंद करा आणि नवीन भांडी खरेदी करावी.असे मानले जाते की नवीन भांड्याच्या स्वरूपात माता लक्ष्मी घरात चालून येते. तयामुळे जूनी झालेली भांडी फेकून न देता तुम्ही ती दान करू शकता. तुमच्या घरात काम करणार्या महिलांना ती भांडी दिली तर त्यावर शनि देवता प्रसन्न होतो.
हे ही वाचा :
निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीचा पिंजऱ्यातला पोपट – संजय राऊतांची टीका
आयरा खानने घेतला मराठमोळ्या अंदाजात होणाऱ्या पतीसाठी खास उखाणा