दिवाळी, ज्याला दीपावली म्हणूनही ओळखले जाते. हा भारतातील सर्वात प्रिय आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. हा दिव्यांचा उत्सव, या उत्सवाबद्दल लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा ओलांडून हा सण भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरा केला जातो. दिवाळी हा एक उत्साही आणि आनंदांचे क्षण म्हणूनच साजरा होतो. दिवळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो.
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. यात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. पंचांगकर्ते दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. यादिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे.
“आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी